दिपकराजे शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या " प्रदेश अध्यक्ष " पदी एकमताने निवड

By : Polticalface Team ,Fri Apr 15 2022 22:07:57 GMT+0530 (India Standard Time)

दिपकराजे शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांच्या आदेशाने व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री नामदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलची स्थापना करण्यात आली, यावेळी दिपक गणपतराव शिर्के यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी सैनिक सेलच्या प्रदेशाध्यक्ष पदी, तर बाबासाहेब जाधव यांची प्रदेश सचिव पदी एकमताने निवड करण्यात आली सदर नियुक्ती पत्र शरद पवार साहेबांच्या हस्ते देण्यात आली. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब, खासदार सुप्रिया ताई सुळे , ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, आदरणीय कर्नल संभाजी पाटील साहेब, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मा. श्री. शिवाजीराव गर्जे साहेब, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप साहेब, प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. प्रमोद हिंदुराव, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश संघटक सचिव मंगेश मोरे, OBC सेल चे श्री. अर्जुन गरुड, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी सैनिक यांच्यासह प्रदेश कार्यकारणीचे पदाधिकारी आदींच्या उपस्थितीत पद नियुक्ती सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेल स्थापन झाल्याने पक्षातील कार्यकर्त्यात जोश निर्माण झाला असून निवडीबद्दल अभिनंदन होत आहे. यावेळी सुभेदार पांडुरंग शिरसाट, सरपंच कॅप्टन SM काळवाघे, बुलढाणा, सुभेदार अजित निंबाळकर, कोल्हापूर, कॅप्टन बाबू गोविंद पोळके, सोलापूर, सुभेदार, सुधीर शिंदे, सातारा, हवालदार पोपट पडवळ, शिरूर, नायब सुबे. संदीप देसाई, सातारा, हवालदार देविदास मुंडे, बीड, हवलदार अजीत काटे, बारामती, पुणे, शिपाई विशाल जाधव, दौंड, हवालदार अनिल फुंदे, सुभेदार किसन भोबाड, माजी सैनिक विजय सिरसाट, माजी सैनिक, कृष्णकांत शिरसाट, माजी सैनिक, विष्णुपंत हांगे, माजी सैनिक शिवाजी काळे, माजी सैनिक शंकर शिरसाट माजी सैनिक अभिजित बेळगे, माजी सैनिक महादेव शिरसाट, माज़ी, सैनिक मूढ़े तातेराव देवीदास, नगर, माज़ी सैनिक चंद्रकांत देवड़े, नगर, सुभेदार प्रवीण येवले, सातारा, सुभेदार सुरेश उमाप, शिरूर, पुणे, हवलदार राजेन्द्र धुमाल, शिरूर,पुणे, हवलदार शहाजी धुमाल,शिरूर,पुणे हवलदार विलास शिवले, शिरूर, पुणे माज़ी सैनिक जयदीप घोलप, हवेली,पुणे आदी अनेक माजी सैनिक व पदाधिकारी उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी