प्रतिष्ठीत ब्रॕड कंपनीच्या चॉकलेट मध्ये आढलल्या आळ्या

By : Polticalface Team ,Sat Apr 16 2022 09:54:28 GMT+0530 (India Standard Time)

प्रतिष्ठीत ब्रॕड कंपनीच्या  चॉकलेट मध्ये आढलल्या आळ्या काष्टी वार्ताहरः श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एका स्विटहोम दुकानातून ग्राहकाने घेतलेल्या प्रतिष्ठीत ब्रॕड कंपनीच्या डेरीमिल्क चाॕकलेट मध्ये अळ्या आढळून आल्याने कंपनी सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत असल्याने मुदत बाह्य संपलेल्या खाद्य पदार्थ वस्तु ग्राहकांच्या माथी मारतात यामुळे ग्राहकांच्या मध्ये संताप व्यक्त होत असून याकडे जिल्ह्यातील अन्न भेसळ विभागाचे संपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. सविस्तर माहिती अशी कि दोन दिवसापूर्वी काष्टी गावातील व्यापारी ग्राहक पियुश कटारिया यांनी गावातील एका प्रतिष्ठीत स्विटहोमच्या दुकानातून खाण्यासाठी डेरीमिल्क कंपनीचे चाॕकलेट घरी घेऊन आले.घरी आल्यानंतर खाण्यासाठी चाॕकलेट फोडले असता त्यातून अळ्या बाहेर आल्याचे दिसून आले. सदर पियुश कटारिया यांनी खरेदी केलेल्या स्विटहोम मध्ये जावून दुकानदारास सत्य परिस्थिती दाखविली त्यावर दुकानदाराने ग्राहकास उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ग्राहकाने पुन्हा आणखी एक चाॕकलेट खरेदी करुण दुकानदारा समोर फोडली त्यामध्ये सुध्दा अळ्या निघाल्या त्यावर दुकानदार म्हणाले आमचा यामध्ये काही दोष नाही.तुम्ही जिल्हा पुरवठादार डिलरशी बोला त्यांना माहिती दिल्यावर ते वेळेवर आले नाही. तरी उशीरा आल्यानंतर संबंधित झालेला प्रकार नगर येथील पुरवठा करणाऱ्या डिलरला सांगिल्यावर त्याने असे होणार नाही सांगितले पण गावातील अनेकांनी सत्य परिस्थिती सांगितली तेव्हा संबंधित डिलरने तुम्हांला कोणाकडे जायचे त्याच्याकडे आमचे कोणी वाकडे करु शकत नाही. आमच्या कंपनीचा ब्रॕड मोठा आहे.आम्हांला अशा किरकोळ विषयाने काही फरक पडत नाही.असे म्हणून गावातून निघून गेला झालेला सर्व प्रकार ग्राहक पियुश कटारिया यांनी बातमीदारांना सांगितला व घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ व फोटो दाखविले. सत्य परिस्थिती पाहिल्यावर खरी घटना समजली परंतु डेरीमिल्क कंपनीचे व्यवस्थापक जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करित आहेत.याची अन्न व भेसळ विभागाने दखल घेऊन सदर दुकानदार व पुरवठादार यांच्यावर पोलिस कार्यवाही करुण असे प्रकार पुन्हा होणार नाही याची दखल घेऊन ग्राहकांच्या जीवाशी होणारा खेळ थांबविला पाहिजे अन्यथा यातून उन्हाळ्याच्या दिवसात कोणाला विषबाधा झाली तर जबाबदार कोण राहिल म्हणून कंपनीवर कडक कारवाई करावी अशी मागणी कटारिया यांनी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी