लोणीत म.फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
By : Polticalface Team ,Sun Apr 17 2022 11:53:56 GMT+0530 (India Standard Time)
लोणी : लोणी खुर्द येथील समता तरुण मंडळाच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.चार दिवसीय या सोहळ्यामध्ये व्याख्यान,भीमगिते यांसह प्रभात फेरी,प्रतिमा पूजन व गावातील ज्येष्ठ व्यक्ती,कोरोना योद्धे,आशा सेविका व गावातील यशवंतांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
दि.११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान झालेल्या या उत्सवात प्रथम पुष्प प्रा.महबूब सय्यद यांनी महात्मा फुले जीवनचरित्र या विषयावर व्याख्यान गुंफले.अध्यक्षस्थानी लोणी गावचे प्रथम नागरिक सरपंच जनार्दन पा. घोगरे होते तर द्वितीय पुष्प प्रा. बाबा खरात यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार यांवर नि. सहा.फौजदार नानासाहेब ब्राह्मणे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान गुंफले.दिनांक १३ एप्रिल रोजी प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम झाला.डॉ.आंबेडकर जयंतीदिनी सकाळी संपूर्ण गावातून आकर्षक प्रभात फेरी
काढण्यात आली. राहता तालुक्याचे आमदार.राधाकृष्ण विखे पाटील( माजी विरोधी पक्षनेते) यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून जयंती उत्सवाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते वाय.बी. ब्राम्हणे होते. यावेळी आशा सेविका,ज्येष्ठ ग्रामस्थ व गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आ.राधाकृष्ण विखे यांनी मनोगत व्यक्त करताना आयोजक तरुणांचे अभिनंदन व कौतुक केले.याप्रसंगी गरजू शाळकरी मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आहे.
ना भूतो अशा या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी पं.स.सदस्य संतोष ब्राम्हणे,ग्रामपंचायत सदस्य मायकल ब्राह्मणे, प्रदीप ब्राह्मणे, प्रकाश ब्राह्मणे,फ्रान्सिस पाळंदे सर,भावेश ब्राम्हणे, सुजित ब्राह्मणे रविंद्र बाळासाहेब ब्राह्मणे, उमेश वानखेडे, विजय ब्राह्मणे, संजय ब्राह्मणे, जयेश ब्राह्मणे, सुनील ब्राह्मणे सर, रामदास ब्राह्मणे सर, विश्वास ब्राह्मणे, एडवोकेट सागर ब्राह्मणे, विशाल ब्राह्मणे, सागर दानियल ब्राह्मणे, सचिन ब्राह्मणे, सुनील विधाते व समता मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट केले .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी