अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल.
By : Polticalface Team ,Sun Apr 17 2022 15:28:15 GMT+0530 (India Standard Time)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पाहण्यासाठी दौंडला चाललेल्या दोन तरुणांना त्या मध्यरात्री रस्त्यात अडवून दहा-पंधरा जणांच्या जमावाने जबरी मारहाण केली होती. चोरीच्या संशयावरून हा प्रकार घडला होता. या प्रकरणात स्थानिक प्रशासन पीडितांची बाजू लावून धरण्याऐवजी मारहाण केलेल्यांच्या वतीने कायदेशीर प्रक्रिया राबवत होते.
मात्र, नमूद प्रकार आंबेडकरी कार्यकर्त्यांसह काही पत्रकारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला.. तर, स्थानिक प्रशासनाने सदरील घटना आमच्या कार्यक्षेत्रात घडली नसल्याचे नमूद करत टोलवाटोलवी केली. उलट बौद्ध तरूणांवरच चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र, त्या तरुणांना जनावरांसारखी मारहाण करणाऱ्या मवाल्यांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. सदरील प्रकाराबाबत काही प्रसार माध्यमांनी आवाज उठवला.
यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ जगताप,ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, NDMJ च्या प्रेरणाताई धेंडे इत्यादींनी सदर प्रकरणी पाठपुरावा केला.
या विषयावर स्थानिक प्रशासनाला जाब विचारला तसेच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी तर थेट घटनेचे कार्यक्षेत्र नाकारणार्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी केली. यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले तसेच प्रशासकीय हालचालीस सुरुवात करत आम्ही ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यास तयार आहोत असे दुधाळ यांनी कबूल केले.
स्थानिक प्रशासनाची बेबंदशाही आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याने प्रशासन ताळ्यावर आले आहे.
स्थानिक प्रशासन नमूद प्रकरणात एक पारखी भूमिका घेऊन पीडीतांच्या विरोधात कारवाई करत होते मात्र वेळीच पीडीतांच्या वतीने आंबेडकरी चळवळ व कार्यकर्ते उभे राहिल्याने या प्रकरणात तालुक्यातील आंबेडकरी चळवळीची ताकद दिसून आली आहे.
यानुसार काल दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी अभिमन्यू साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत नंतर संजय शेळके, आकाश मोरे, पांडुरंग देवरे, गोविंद सावंत, विकास थोरात, साहेबराव गवळी, आनंद जगताप, विष्णू गर्दुळकर सर्व राहणार बेलवंडी स्टेशन कंट्रक्शन ऑफिस शंकर अर्थमूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नमूद गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात ॲट्रॉसिटी चे कलम 3(1) (r), 3(1) (s) तसेच भादवि कलम 323, 504, 506, 143, 147, 148, 149, 324 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.