शेतकऱ्याची मुलगी कु.मिनल राजू गावंडे यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेट-बी या पदावर उंच भरारी राज्यभरातून कौतुक

By : Polticalface Team ,Tue Apr 19 2022 12:16:59 GMT+0530 (India Standard Time)

शेतकऱ्याची मुलगी कु.मिनल राजू गावंडे यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेट-बी या पदावर उंच भरारी राज्यभरातून कौतुक बीड प्रतिनिधी: यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील कु.मिनल राजीव गावंडे यांची एमपीएससी 2019 परीक्षा सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेट-बी या पदावर निवड झाली आहे. ह्या वडगाव येथील असून गावामध्ये शाळा नसल्यामुळे यांचे शिक्षण धामणगाव रेल्वे येथे झाले प्राथमिक शिक्षण श्रीमती हरीबाई भागचंद्रजी विद्यालय धामणगाव रेल्वे येथे झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय धारे येथे झाले. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्रो.राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रीसर्च बडनेरा अमरावती येथून केली. (College topper gold medalist 2019) मध्ये पहिल्याच प्रयत्नात सार्वजनिक बांधकाम विभाग या मध्ये सहाय्यक अभियंता ग्रेट- b म्हणून निवड झाली. मी माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील माझे भाऊ यांना देते कारण शेतामध्ये काम करून त्यांनी मला शिक्षणासाठी पैसे पुरवले माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे हे सर्व जे उभे राहिले आहे ते माझे वडील व माझे भाऊ माझे यांच्यामुळे झाले आहे. माझे बहिण व भाऊ मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाले आहे व माझी बहीण ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून केली माझे वडील शेतकरी आहेत व माझी आई शेतकरी आहे. तुमचं ध्येय निश्चित असेल तर तुम्हाला कोणीही ते मिळवण्यापासून थांबू शकत नाहीत असे मिनल राजू गावडे यांनी म्हटले आहे. या सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता ग्रेड-b या निवडीबद्दल माननीय प्रकाश भैय्या सोनसळे सरसेनापती-धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य यांना ही माहिती मिळतात मिनल ताईंशी संपर्क साधुन म्हटले की, आपण अहोरात्र अभ्यास करून या पदाचे शिखर गाठले व आपले आई-वडील शेतकरी कष्टकरी यांचे स्वप्न साकार केले त्याबद्दल तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो व एक शेतकऱ्यांची मुलगी असून सुद्धा आपण उंच भरारी घेण्याची जिद्द चिकाटी करून रात्रभर अभ्यास केला यातून नक्कीच या समाजामध्ये तुमच्या सारख्या मुली तुमच्यासारखे मुले तुमचा आदर्श घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. नक्कीच या समाजामध्ये शिक्षणाचे झरे वाहतील व या समाजामधील मुले-मुली मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न पाहतील मी माझ्या कुटुंबाच्या वतीने ,धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आपल्या निवडीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा देतो. ताईंच्या निवडीबद्दल राज्यभरातून तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष