उन्हाच्या तीव्रतेबरोबरच थंड पेयाची मागणी वाढली श्रीगोंदा तालुक्यात 40 अंशच्यापुढे तापमान जनजीवन विस्कळीत शेती उद्योगाची तीन तेरा

By : Polticalface Team ,Wed Apr 20 2022 14:26:56 GMT+0530 (India Standard Time)

उन्हाच्या तीव्रतेबरोबरच थंड पेयाची मागणी वाढली श्रीगोंदा तालुक्यात 40 अंशच्यापुढे  तापमान जनजीवन विस्कळीत शेती उद्योगाची तीन तेरा श्रीगोंदा( प्रतिनिधी अस्लम शेख)उन्हाची तीव्रता आता मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने थंड पेयाची मागणी वाढताना दिसते. श्रीगोंदा तालुक्यात जवळपास 40 अंशाच्या पुढे तापमानाची नोंद होताना दिसते. अंगाची लाहीलाही करणारा हा चालू वर्षीचा उन्हाळी हंगाम अत्यंत थरारक रूप धारण करताना दिसत आहे. या अतिउष्णतेमुळे विहिरी कूपनलिका तसेच गावच्या पुरवठ्याच्या पाणी पातळीत देखील मोठी घट होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक खेडोपाडी महिला व ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे. यामध्ये आहे त्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होताना दिसत आहे. त्यामुळे चालू वर्षीचा उन्हाळी हंगाम सर्वांनाच बरेच काही सांगून जाताना दिसत आहे. अशा या उन्हाळी हंगामात तालुक्यातील अनेक ग्रामदेवतेचा यात्राउत्सव साजरा होत असतानाच यात्रा कालावधीत देखील अनेक गावांमध्ये अतिउष्णतेमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणताना दिसत आहे. उन्हाळी हंगाम म्हटलं की, गावोगावी शहर व खेडोपाडी रसवंती गृह थाटली जात आहेत. शेतातून अगर प्रवासातून आल्यानंतर उष्ण शरीर थंड तसेच कष्टाच्या कामाचा थकवा घालवण्यासाठी उसाचा रस त्याबरोबरच इतर थंड पेयाचा आस्वाद घेण्यासाठी रसवंती ग्रहावर गर्दी होताना दिसत आहे. एकीकडे उन्हाळी हंगाम वेगात सुरू असताना शेती उद्योगाची कामे मात्र ठप्प होताना दिसत आहेत. चालू उन्हाळी हंगामामध्ये लिंबू फळांचा भाव गगनाला भिडला तर कांद्याचा भाव मात्र कवडीमोल दिसून येतो. चांगल्या प्रतीचा कांदा 10 ते 12 रुपये किलोने बाजार समित्यांमध्ये व्यवहार होताना दिसतो आहे. त्यामुळे चालू वर्षीचा कांद्याने शेतकऱ्यांचा मोठा वांदा केल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने कांदा वाखारीमध्ये सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी लगबग सुरू केल्याचे दिसते. ज्यावेळेस कांद्याला दुपटीपेक्षा जास्त भाव मिळेल त्या वेळेसच वखारीतून कांदा मार्केटमध्ये आणण्याचे काही शेतकऱ्यांनी स्वप्न ठेवले आहे. सद्यस्थितीला कांदा उत्पादक शेतकरी दहा ते बारा रुपये किलोने कांदा विक्रीसाठी देण्यास नकार देताना दिसत आहे .कारण काढणे कापणे मजुरी व बारदानचे वाढलेले भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने कांदा उत्पादकांनी अखेर वखारी तयार करून पुढे वाढीव भावाची अपेक्षा ठेवली आहे. श्रीगोंदा तालुक्यात यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन तयार झाले आहे. परंतु भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कमी पाण्यावर शेतकरी अधिक उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतानाच बाजारपेठेत मात्र शेतीमालाला कवडीमोल किंमत मिळते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे बोलले जात आहे. श्रीगोंदा तालुका हा 70 टक्के सिंचन क्षेत्रात मोडला जातो. असे जरी सांगितले असले तरी कुकडी लाभ क्षेत्रात मात्र आवर्तन वेळेत मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेली उभी पिके मात्र पाण्याअभावी भुईसपाट होतात. त्यामध्ये उन्हाळी हंगाम सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहेत .कुकडीचे पाणी आले अन गेले अशी अवस्था या कुकडी लाभक्षेत्रात दरवर्षी होत असल्याने शेतकऱ्यांचा मात्र अपेक्षा भंग होत आहे. मागील आठवड्यात कुकडीचे पाणी 132 मधून सोडण्यात आले. त्याचा वेगही अत्यंत कमी दाबाने ठेवण्यात आला आणि कालावधी देखील कमी केला. त्यामुळे या उन्हाळी कुकडी आवर्तनचा लाभ टेल खालील शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. वास्तविक पाहता या लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्थांनी शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याची गरज होती. परंतु पाण्याचा गेज कमी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष या सर्वच बाबी कारणीभूत ठरल्याने शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. त्यामुळे चालू वर्षाचा तीव्र उन्हाळी हंगाम आणि पाणीटंचाईचा आगडोंब यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष