निकृष्ट साखळी बंधारे प्रकरणात थातूरमातूर काम करून ठेकेदार आधिका-यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न

By : Polticalface Team ,Wed Apr 20 2022 14:31:58 GMT+0530 (India Standard Time)

निकृष्ट साखळी बंधारे प्रकरणात थातूरमातूर काम करून ठेकेदार आधिका-यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न बीड(प्रतिनीधी):जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मौजे. गोलंग्री ता.जि.बीड येथील लघुपाटबंधारे विभागामार्फत ४८ लाख रूपये किंमतीच्या निकृष्ट साखळी बंधारे प्रकरणात तत्कालीन शाखा अभियंता श्री.पी.डी.ढेरे यांना निलंबित करण्यात आले होते तर तत्कालीन उपअभियंता/कार्यकारी अभियंता श्री.बोंबलगे ए.एस. यांची मंत्रालयीन चौकशी सुरू असून संबधित ठेकेदार श्री.एस.पी. चव्हाण यांच्यावर नेकनुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
शासनाने अपहारीत रक्कम शासन तिजोरीत जमा करून नविन बंधारे बांधून द्यावेत:- श्रीकांत कवडे, विनोद भोईटे, नितिन कवडे
तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांना तक्रार केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष बंधा-याची पाहणी करून अभियंता व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हे दाखल झाले परंतु अपहारीत रक्कम वसूल करण्यात आली नसुन ती वसुली करण्यात यावी व गाव दुष्काळमुक्त होण्यासाठी नविन साखळी बंधारे बांधण्यात यावेत डागडुजीच्या नावाखाली थातूरमातूर काम करून भागणार नाही,आम्ही दि.२२ शुक्रवार रोजी पासुन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा ईशारा श्रीकांत कवडे, विनोद भोईटे, नितिन कवडे, सुनिल कवडे, जयसिंग कवडे, शिवाजी कवडे आदिंनी जिल्हाप्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
जलसंधारण विभिगात टक्केवारी शिवाय कामच होत नसल्यामुळे जलयुक्त शिवार झाले दगडगोटेयुक्त शिवार:-डाॅ.गणेश ढवळे
बीड मधिलि जलसंधारण विभागाच्या कामात अभियंत्यांना काम सुरू होण्याअगोदर टक्केवारी दिल्याशिवाय काम होत नसल्याची अभियंता आणि कंत्राटदार यांच्यातील संभाषण सोशल मिडीयावर व्हायरल होत असून त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचे स्पष्ट होत असून जलसंधारणाची कोविडच्या अगोदर मंजूर कामांना स्थगिती दिली गेली होती ती कामे आता नव्याने करायची असतील तर नव्याने पत्र प्राप्त करून द्यावे लागत असून त्या पत्रासाठी पुन्हा एकदा पैशाची मागणी करण्यात येत असल्याचे दिसून येत असून वरिष्ठ आधिका-यांपर्यंत पैसे पोहोच केल्याचे सुद्धा संभाषणावरून लक्षात येत आहे, त्यामुळेच निकृष्ट दर्जाची कामे होत असून कोट्यावधी रूपये खर्चुनसुद्धा दुष्काळमुक्ति होताना दिसत नसुन जलयुक्त शिवार दगडगोटे युक्त शिवार बनले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी