पारगाव सुद्रिकच्या डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,Wed Apr 20 2022 14:51:52 GMT+0530 (India Standard Time)

पारगाव सुद्रिकच्या डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयात मंगळवार दिनांक 19 रोजी सन २००६/०७ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेले एस .एस .सी .चे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. पारगाव सुद्रिक येथील ग्रामदैवत सुद्रिकेशवर महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त माजी विद्यार्थी यात्रेनिमित्त विद्यालयात आले... असता त्यांनी विद्यालयात सदिच्छा भेट देऊन विद्यालयाच्या परवानगीने विद्यालयात तात्काळ स्नेहमेळाव्याचे आयोजन केले... याप्रसंगी विद्यालयाच्या प्रगतीचा झालेला कायापालट, विद्यालयातून एसएससी पर्यंत मिळालेले शिक्षण रुपी संस्काराचे धडे, जिथे आपण शिक्षण घेताना संस्कारात वाढलो त्या गुरूंचा याप्रसंगी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या सर्व आदर प्रित्यर्थ सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात केली... सदर कार्यक्रमात या विद्यालयाचे किर्तीवंत, गुणवंत, माजी विद्यार्थी शोभा भगत, दर्शन आल्हाट, पोलीस निरीक्षक भगवान हिरवे, शैला लबडे आदींनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यालयात मिळालेले शिक्षकांकडून मायेचे शिक्षण, शालेय शिस्त बरोबरच गुणसंपन्न शिक्षण लाभले. त्यामुळेच आम्ही अनेक क्षेत्रात उच्चपदस्थ पदावर भरारी घेऊ शकलो याचे सर्व श्रेय या विद्यालयातील ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांकडे जाते . असे भावनिक उदगार काढले व या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर यांचे ऋण व्यक्त करत आत्मीयता व्यक्त केली... सदरचा स्नेहमेळावा घडवून आणण्यामध्ये विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रीती रंधवे, अरुण जगताप आदींनी कष्ट घेतले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर, पर्यवेक्षक श्री. राजेंद्र हिरवे, वरिष्ठ लिपिक अशोक आळेकर आदींनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. ज्या- त्या क्षेत्रात नोकरीच्या निमित्ताने कार्यरत आहात त्या ठिकाणी प्रामाणिकपणा आणि सचोटी अंगी बाळगावी निश्चितच आणखी वेगळे ध्येय घाटता येईल, अशा शुभेच्छा मुख्याध्यापिक अलका दरेकर यांनी यावेळी माजी विद्यार्थ्यांना दिल्या. याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी विद्यालयाला २०,०००/₹ची स्वच्छेने देणगी दिली... या माजी विद्यार्थ्यांपैकी उच्चपदस्थ कार्यरत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्यावतीने मुख्याध्यापिका श्रीमती अलका दरेकर यांनी नागरी सत्कार केला... प्रसंगी डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयातील शिक्षण रुपी विद्यार्थी कसा घडला जातो याचे उत्तम उदाहरण देऊन श्रीमती दरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुढील कार्यास या माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री मच्छिंद्र.मडके यांनी केले... यावेळी या कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक वृंद उपस्थित होते. आभार पांडुरंग काळे यांनी मानले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी