शॉर्ट सर्किटमुळे एक एक्कर आंब्याची बाग जळाली, शेतकऱ्याचे झाले लाखोंचे नुकसान
By : Polticalface Team ,Thu Apr 21 2022 17:54:23 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील सुभाष सोनबा नेटके यांची गट.नंबर 302 येथील १ एकर हापुस,केशर व इतर जातीचे अंब्याची झाडे काही क्षणातच जळून खाक झाली. सविस्तर वृत्त आशा आहे की आरणगाव दुमाला येथील सुभाष सोनबा नेटके यांची आरणगाव दु.येथील गट.नं.302 मध्ये त्यांच्या सुन रेखा संजय नेटके यांच्या नावे असणाऱ्या क्षेत्रामध्ये आंब्याची झाडे तसेच जमिनीच्या दोन्ही बाजूंनी साग व नारळ तसेच इतर फळझाडे अंदाजे वीस वर्षांपूर्वी लागवड केलेली आहेत, व त्यांच्या बागेमधील आंब्याच्या सर्वच झाडांना मोठ्या प्रमाणात आंबा लागलेला होता, तसेच नारळानां मोठ्या प्रमाणात नारळ होते. तसेच बागामध्ये चिकु, लिंबु इतरही काही झाडे होते, दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या क्षेत्रांमधून गेलेल्या लाईटच्या मेन लाईचे शॉर्टसर्किट झाले व आंब्याच्या बागे ला आग लागून काही क्षणातच आगीने संपूर्ण बाग जळून गेला, आग इतकी भयंकर होती की ती विजवणे ही शक्य नव्हते,तसेच त्यांच्या शेजारी दिलीप मोरे यांच्या लिंबू ची बाग व काढून ठेवलेल्या कांद्या चे ही जळून नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात आहे त्या मध्ये शाॅटसर्किट मध्ये लागलेल्या आगीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सदरील घटनास्थळी तलाठी गायकवाड मॅडम, कृषी सहाय्यक आरणगाव हिरवे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी बेलवंडी यांनी येऊन पंचासमक्ष पंचनामा केला,तसेच सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र चव्हाण, संजय शिंदे,सरपंच बाळासाहेब सातव पोपट कुताळ, केशव शिंदे, सचिन शिंदे, भाऊसाहेब चव्हाण, दिलीप मोरे, गोविंद नेटके,नवनाथ चव्हाण,पत्रकार अमोल बोरगे इत्यादींनी भेट दिली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी