महिलांशी गैरवर्तण करणा-या डाॅ.अशोक बांगरची सेवासमाप्ती टाळुन बदली अजित पवार, मुख्य कार्यकारी आधिकारी यांची कृपादृष्टी:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Fri Apr 22 2022 13:47:16 GMT+0530 (India Standard Time)
बीड जिल्ह्य़ात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना त्याचे गांभीर्य जिल्हाप्रशासनातील मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांना दिसुन येत नाही त्यामुळेच महिलांशी गैरवर्तण करणा-या डाॅ.अशोक बांगर यांचे निलंबन करण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर,अड.संगीता धसे, स्वप्निल गलधर, शेख युनुस च-हाटकर , शेख मुबीन, परमेश्वर लोंढे, डाॅ.संजय तांदळे,श्रीकांत गदळे, ,संजीवनी राऊत,अश्विनी झणझणे, किस्किंदाताई पांचाळ, वर्षा कुलकर्णी, शुभांगी कुलकर्णी यांनी दि.२५ फेब्रुवारी रोजी जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलन केल्यानंतर जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांनी त्रिसदस्यीय समिती नेमून कारवाईचे आदेश दिले होते. परंतु संबधित प्रकरणात अजित पवार यांनी डाॅ.अशोक बांगर यांची पाठराखण करत त्याचे निलंबन अथवा सेवासमाप्ती करण्याऐवजी केवळ बदली करण्यात आली असून त्यामुळेच एकप्रकारे पाठराखण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
जिल्हापरिषदेसमोर आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर कारवाईचा फार्स
नेकनुर येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय आधिकारी(आयुष कार्यक्रम )डाॅ.अशोक बांगर याने महिलेशी गैरवर्तण केल्यानंतर महिलेने वैद्यकीय अधिक्षक ग्रामिण रूग्णालय नेकनुर डाॅ.शिंदे यांना तक्रार केल्यानंतर त्याची व्हीडीओ चित्रफीत उपलब्ध झाल्यावर त्यांविषयी विविध दैनिकातुन बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर व अड.संगीता धसे यांनी दि.२५ मार्च रोजी जिल्हारूग्णालयासमोर धरणे आंदोलन केल्यानंतर त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली, राजकीय दबावामुळे महिलेने लेखी जवाब देण्यास नकार दिला परंतु डाॅ.सुरेश साबळे यांनी त्याचा पुर्वईतिहास व त्याच्याबद्दल तक्रारीवरून सेवासमाप्ती करण्याची शिफारस अजित पवार यांना केली होती परंतु तात्काळ कारवाई होत नसल्यामुळे डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि.१८ एप्रिल रोजी जिल्हापरिषदेसमोर आंदोलनाचा ईशारा देण्यात आला होता. त्यानंतर
त्याची सेवा समाप्ती न करता केवळ गेवराई येथे बदली करण्यात आली असून एकप्रकारे पाठराखण केली आहे.
रूपालीताई चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांना तक्रार करणार:-डाॅ.गणेश ढवळे
महिलांशी गैरवर्तण प्रकरणात डाॅ.सुरेश साबळे यांनी सेवासमाप्तीची शिफारस केलेली असताना अजित पवार यांनी त्यात बदलीची कुठलीही सुविधा नसताना केवळ पाठराखण करत गेवराई याठीकाणी त्याची बदली केली असून गेवराई येथील उपजिल्हारूग्णालयातील महिलांच्या अब्रुशी खेळण्याचा प्रकार असुन दि.२८ एप्रिल रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर असलेल्या रूपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांना संबधित प्रकरणात प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार करणार आहोत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी