अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांची धावपळ श्रीगोंदा तालुक्यात अवकाळी पावसाचे दर्शन शेतकरी हतबल

By : Polticalface Team ,Fri Apr 22 2022 21:59:57 GMT+0530 (India Standard Time)

अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांची धावपळ श्रीगोंदा तालुक्यात अवकाळी पावसाचे दर्शन शेतकरी हतबल श्रीगोंदा (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यात अनेक भागांमध्ये शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पाऊस बरसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यामध्ये सर्वत्र कांद्याची काढणी व कापणीचे काम जोमात सुरू आहे. त्यामध्ये कापणी करून ठेवलेला कांदा शेतात वळई लावून उघड्यावरच ठेवल्याने गुरुवारी मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाचे शिंतोडे सुरू झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झोपच उडाली. आणि कांदा झाकण्यासाठी एकच धावपळ सुरु झाली. शुक्रवारी रात्रभर जो तो कांदा उत्पादक शेतकरी ताडपत्री, प्लॅस्टिकचा कागद घेऊन धंदा सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी लगबग सुरू झाली. एकीकडे कांद्याचे भाव कोसळले आणि दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने गाठले. अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकरी कांदा उत्पादनाला संरक्षण देण्यासाठी जिवाचे रान करताना दिसून येत होते. सद्यस्थितीला मागील दोन महिन्यापूर्वी अशाच अवकाळी पावसाने उभ्या कांद्याचे मोठे नुकसान केले. त्यातून पुन्हा शेतकऱ्यांनी जिद्दीने कांद्याचे पीक उभे केले .लागवड खर्च, खुरपणी, नंतर काढणी व कापणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने मात्र पुन्हा कांदा उत्पादकांना गाठले. दरम्यान स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी नुकतेच दोन दिवसापूर्वी कृषी मंत्री दादा भुसे, माजी केंद्रीय मंत्री शरच्चंद्र पवार आणि केंद्रीय कृषिमंत्री इत्यादींची नुकतीच भेट घेऊन कांदा उत्पादकांच्या समस्या यावेळी पोटतिडकीने मांडल्या. त्यानंतर 19 एप्रिल पासून नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. यावेळी नाफेड मार्फत पंधरा रुपये किलोने कांदा खरेदी करण्यास या वेळी मंजुरी मिळाली .वास्तविक पाहता कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटातून मार्गक्रम करीत आहेत. कांदा उत्पन्नातून काही तरी शेतकऱ्यांच्या पदरात हाती लागावे हा उद्देश स्वतंत्र भारत पक्षाने राज्यकर्ते व शासनाच्या निदर्शनास आणून दिले. आणि कुठेतरी या प्रश्नाला वाचा फुटली गेली. कांद्याचे भाव जर कवडीमोल असतील तर शेतकऱ्यांनी जीवन जगायचे कसे ?असा प्रश्न व सवाल स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी राज्यकर्त्यांसमोर मांडला. शेतकऱ्यांचे जीवन हे अत्यंत कष्टमय बनले गेले आहे. शेती उत्पन्नातून काही तरी आर्थिक दृष्ट्या पदरात पडावे यासाठी रात्रंदिवस शेतकरी काबाडकष्ट करताना मोठी मेहनत घेताना दिसत आहेत. मात्र कांद्याचे उत्पन्न हातातोंडाशी येत असतानाच कांद्याचे भाव मात्र कवडीमोल होत आहेत. त्यातून शेतकऱ्यांची मोठी घोर निराशा होताना दिसते. असे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून पोटतिडकीने सांगितले जात आहे. दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात ऊस उत्पादनाबरोबरच येथील शेतकरी कांद्याचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. कमी पाण्यावर अधिक उत्पन्न घेत असतानाच शेतकरी या पिकासाठी ठिबक सिंचन द्वारे आधुनिक पद्धतीने कांद्याचे उत्पादन अंतिम टप्प्यात आणले. आता हातातोंडाशी आलेला हा कांदा अवकाळी पावसाच्या लहरीपणामुळे भुईसपाट होतो की काय? असा प्रश्न देखील या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सत्तावला जाऊ लागला आहे. काल रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या अंगावर शहारे उभे राहू लागले. आहे कारण उघड्यावरील कांदा अवकाळी पावसाने भिजला तर या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते .यासाठी अनेक शेतकरी प्लास्टिक ताडपत्री व प्लास्टिक कागद खरेदी करण्यासाठी धावपळ करताना सर्वत्र दिसून येत आहेत .एकूणच अवकाळी पाऊस हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना डोळ्यात अश्रु आणणारा ठरणार आहे. शासनाने कांद्याला वाजवी भाव दिला पाहिजे, अशी भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष