बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ
By : Polticalface Team ,Sat Apr 23 2022 12:40:35 GMT+0530 (India Standard Time)
बारामती(अमोल गायकवाड ): तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. शनिवार दिनांक 23/04 /2022 रोजी सकाळी 5:30 वा देवांची हळदी व रात्री 12:15 ला श्रींची लग्न रविवार दिनांक 24/04 / 2022 रोजी देवाचा नेवैद्य,नवस व दंडवत व रात्री छबिना व लक्ष्मी म्युझिकल ब्रास बॅन्ड कराड तसेच गणेश हलगी ग्रुप माळेगाव त्याचबरोबर मावळा पथक कोराळे व दारूगोळ्याचीआतिषबाजी होईल. सोमवार दिनांक 25/04/ 2022 रोजी नामांकित पैलवानच्या निकाली कुस्त्या व रात्री नऊ वाजता मनीषा सिद्धटेककर सोबत नृत्य अप्सरा रेश्मा नारायणगावकर यांचे लोकनाट्य तमाशा मंडळ होईल. मंगळवार दिनांक 26 /04 /20202रोजी गोल्डन गर्ल सुवर्णा काळे निर्मित हीच ती शुक्राची चांदणी हा नामांकित ऑर्केस्टा होणार असल्याची माहिती वडगाव निंबाळकर येथील भैरवनाथ यात्रा कमिटीने दिली आहे.
वाचक क्रमांक :