कीरण विमल पोटे लिखित नजरिया या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
By : Polticalface Team ,Sat Apr 23 2022 14:38:23 GMT+0530 (India Standard Time)
कोल्हापूर प्रतिनिधी:
तमिळनाडू मध्ये नुकत्याच झालेल्या गोल्डन हॉर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये येथील किरण केवल पोटे लिखित व दिग्दर्शक "नजरिया" या हिंदी लघु चित्रपटाला सर्वोत्कृष्ट भारतीय लघु चित्रपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे. या
लघुपटाला आतापर्यंत वेगवेगळ्या आठ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यापैकी गोल्डन हॉर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मधील स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.फेस्टिव्हलमध्ये अमेरिका, इंग्लंड, फिलिपाईन्स, चीन, कॅनडा,इराण,फिनलॅंड, ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील सुमारे शंभर लघुचित्रपटांचा अधिकृतरित्या समावेश करण्यात आला आहे.त्यामधून "नजरिया" हा सर्वोत्कृष्ट भारतीय लघु चित्रपट ठरला.
वाचक क्रमांक :