अखेर आरटीओ कार्यालयातील ५ एजंटावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,Sun Apr 24 2022 14:31:14 GMT+0530 (India Standard Time)

अखेर आरटीओ कार्यालयातील ५ एजंटावर फसवणुकीचा गुन्हा दाखल बीड प्रतिनिधि: आरटीओ कार्यालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून खाजगी एजंटाच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे तयार करून बनावट आरसी, परवाने प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले होते त्यात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे, सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे,मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन, माजी सैनिक प्रकाश वाघमारे सहभागी झाले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बीड यांनी उपप्रादेशिक परिवहन आधिकारी बीड यांना मुद्यांबाबत चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगानेच दि.२२ एप्रिल रोजी उपप्रादेशिक परिवहन आधिकारी स्वप्निल माने यांच्या फिर्यादीवरून आधिका-यांच्या बनावट स्वाक्ष-या करून खोटे कागदपत्रे तयार करणे,खोट्या स्वाक्ष-या करून वाहन हस्तांतरण करणे, वाहनावरील बोजा उतरवणे आदि गैरव्यवहार उघडकीस आल्याने कार्यालयीन आधिका-यांची तसेच शासनाची फसवणूक केल्याबद्दल बीड ग्रामिण पोलीस ठाण्यात गुफरान बेग, सय्यद इरफान, दिगंबर गायकवाड, बाबा काजी, शहाजान खान (सर्व रा.बीड )यांच्यावर कलम ४२०,४६७,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे करत आहेत.
परराज्यातील वाहनांना परवाने, कोट्यावधींचा घोटाळा, सीबीआई चौकशी करा;छोटे मासे गळाला, अजुन मोठे मासे जाळ्याच्या बाहेरच:-डाॅ.गणेश ढवळे
सध्या गुन्हे दाखल झालेले छोटे मासे असुन मुख्यतः लाॅकडाऊन कालावधीत औरंगाबाद येथून कामकाज सुरू असून बीड आरटीओ कार्यालयातुन हरियाणा, गुजरात, राजस्थान येथील वाहनचालकांना बीड आरटीओ कार्यालयातुन बोगस परवाने देण्यात आले असुन प्रति परवाना २५-३० हजार रूपये दर ठरलेला असून एकादिवसात परवाना दिला जात असे तसेच नाॅनयुझ प्रमाणपत्र वितरणात शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडवून आधिकारी-कर्मचारी मालामाल झाले असून संबधित प्रकरणात सीबीआई मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.