सर्व समुदायासाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
                      
                
            
               By : Polticalface Team ,Mon Apr 25 2022 16:30:49 GMT+0530 (India Standard Time)
       
               
                           
              वांद्रा:  येथील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या तीन एकर जागेत सर्व समुदायांसाठी राज्यातील सर्वात मोठे वसतिगृह मुंबईत उभारणार असून, या वसतिगृहात सारथी, महाज्योती व आर्थिक दुर्बल घटक व सर्व जाती, धर्माच्या समुदायातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाईल. अशी घोषणा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
आज उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेतंर्गत निर्माण करण्यात आलेल्या मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार नरेंद्र दराडे, मोहम्मद इस्माईल अ. खा., माजी आमदार अनिल कदम, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी  गंगाथरन डी., उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने, महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे, सारथीचे वरिष्ठ प्रकल्प संचालक डी. डी. देशमुख आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सुरुवातीच्या काळात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी वसतिगृहे निर्माण केली व शिक्षणाची कवाडे सर्वांसाठी खुली केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात आणून त्यांची वसतिगृहात राहण्याची सोय करणे, उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी पाठविण्यासाठी मदत करणे हा विचार त्याकाळात शाहू महाराजांनी केला. महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सुद्धा शिक्षण क्षेत्रात मोलाचे आहे. आजच्या काळात शिक्षणाचे चित्र बदलले असून शिक्षणाची साधने  सुद्धा अधिक प्रगत झाली आहेत. आपल्या संविधानाने आपल्याला सर्वधर्म समभाव ही शिकवण दिली आहे. देशात वेगवेगळ्या जाती, धर्म व पंथ जरी असले तरी सर्वांना एकमेकांचा आदर करण्याची शिकवण आपणास शिवाजी महाराजांनी दिली व त्याच मार्गाने फुले, शाहू व आंबेडकर यांनी  सर्वांना पुढे नेले व आजही सर्वांना त्याशिवाय तरणोपाय नाही, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, आज मातोश्री मुलींचे वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून या वसतिगृहात वास्तव्यास येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घ्यावे. उच्च शिक्षणाची कास धरून आपले भवितव्य, पालकांचे व देशांचे नाव उज्वल करावे. आपण सर्व भारतीय आहोत ही गोष्ट लक्षात घेवून विद्यार्थ्यांनी एकत्र शिक्षण घेवून एकोप्याची भावना मनात बाळगून प्रत्येकाची उन्नती साधावी, असेही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ आपल्या मनोगतात म्हणाले, आज मातोश्री मुलीच्या वसतिगृहाचे लोकार्पण झाले असून, या वसतिगृहात महाज्योती, सारथी व आर्थिक दुर्बल घटकातील सर्वच विद्यार्थींनींना एकत्र राहून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. व एकत्रित शिक्षणाने सर्वांमध्ये एकोप्याची भावना दृढ होणार आहे.
लहानपणासूनच शिक्षणासाठी सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळाल्यास शिक्षणासोबतच  प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडणार आहे. सर्व मुला-मुलींनी उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील राहून, डॉक्टर, इंजिनियर्स, आय. टी. क्षेत्रात प्राविण्य मिळविले पाहिजे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही शिकून देशाचे नाव उज्ज्वल करा असा संदेश यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आज मातोश्री मुलींच्या वसतिगृहाच्या धर्तीवरच रत्नागिरी, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी 2 वसतिगृहे सुरू  करणार आहेत. व भविष्यातही वसतिगृहांची निर्मिती चळवळ महाराष्ट्रभर राबविणार आहोत. मातोश्री मुलींच्या वसतिगृहात 200 विद्यार्थी क्षमता असून यात 75  विद्यार्थी सारथी संस्थेकडून 75  विद्यार्थी महाज्योती संस्थेकडून व 50 विद्यार्थी आर्थिक व दुर्बल घटकातून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित केले जाणार आहेत. या कार्यक्रमास शहरातील पॉलिटेक्निकल कॉलेज, एच पी टी कॉलेज,के.टी.एच. कॉलेज,  स्कॉऊट, एन.सी.सी चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातिला मान्यवरांच्या हस्ते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष