हर्षवर्धन पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी वीज भारनियमन व विविध विषयांवर चर्चा...
By : Polticalface Team ,Wed Apr 27 2022 14:47:04 GMT+0530 (India Standard Time)
इंदापूर प्रतिनिधी ( तनवीर जमादार):
राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वभाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुंबई येथे शासकीय निवासस्थानी भेट घेऊन राज्यात सध्या सुरू असलेल्या विजेच्या भारनियमन प्रश्नी भाजपाकडून शासनावर दबाव वाढविणे यासह विविध विषयांवरती सुमारे पाऊण तास सविस्तर चर्चा केली.
राज्या सरकारने विधिमंडळात 3महिने वीज तोडणार नाही असे जाहीर केले,मात्र दुसऱ्या बाजूला वीज भारनियमन लागू करून शेतकऱ्यांना व नागरिकांना तात्र देण्याचे काम राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून साध्य सुरू आहे.वीज भारनियमनामुळे ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.असे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले राज्यातील विरोधी पक्ष नेता म्हणून मी यासंदर्भात राज्य सरकारला जाब विचारणार आहे. तसेच भाजीपाच्या संघटना पातळीवरही भारनियमनाच्या विरोधात राज्यभर आवाज उठविला जाईल.असे याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तसेच या भेटीत पक्ष संघटना बळकट करणे,साखर उद्योगातील केंद्र सरकारशी संबंधित विषय,आगामी निवडणुका, राजकीय सद्य: स्थिती आदी अनेक विशयांवरती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मध्ये सविस्तरपणे चर्चा झाली.
वाचक क्रमांक :