मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेने केली सहकार निवडणूक कायद्याची पायमल्ली

By : Polticalface Team ,Thu Apr 28 2022 14:20:32 GMT+0530 (India Standard Time)

मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेने केली सहकार निवडणूक कायद्याची पायमल्ली श्रीगोंदा प्रतिनिधी दि. २७: मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथील मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून सहकार निवडणूक कायद्यानुसार ३१ मार्च रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. या यादीवर ३१ मार्च ते ११ एप्रिल पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. या हरकतीवर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी २१ एप्रिल रोजी निर्णय देणे अपेक्षित होते व पात्र मतदारांची यादी २६ एप्रिल रोजी जाहीर करणे निवडणूक कार्यक्रमानुसार बंधनकारक असूनही अद्यापही अंतिम मतदार यादी प्रसिद्ध न केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बोगस मतदारांना व निलंबित संचालकांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी सहकार निवडणूक कायद्याला न जुमानता प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. याबाबत साहेबराव उंडे, गेना मांडे, बेबी अंबादास मांडे यांनी बुधवार दि.२७ रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण सचिव यशवंत गिरी यांच्याकडे तक्रार केली आहे की प्रारब्ध मतदार यादीचा कार्यक्रम सहकार निवडणूक कायद्यानुसार मुदतीत पार न पडल्याने शासकीय लेखा परीक्षक यांच्याकडून मतदार यादी पुन्हा तयार करून मतदान प्रक्रिया कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात यावी. निवडणूक कार्यक्रम विहित तारखेनुसार न पार पडता हरकतीवर निकाल देणे व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या गोष्टीत दफ्तर दिरंगाई केल्यामुळे निवडणूक कार्यक्रम हलक्यात घेऊन सचिव व पदाधिकाऱ्यांनी निवडणूक संहितेचा भंग केला आहे. त्यामुळे मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचा "हम करे सो कायदा" या उक्तीप्रमाणे बोगस सभासदांना मतदार यादीत समाविष्ट करणे व १३ पैकी ४ संचालक बोगस कर्ज प्रकरण, खोटे कागदपत्रे, थकबाकी या व इतर कारणामुळे निलंबित झालेल्या संचालकांचा मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालय व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्यात मोठी आर्थिक उलाढाल होत असून सहकार निवडणूक कार्यक्रमाला कोलून देण्याचे काम सुरू आहे. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण सचिवांनी या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी हरकतदारांनी केली आहे. चौकट: साहेबराव उंडे, सभासद शेतकरी व हरकतदार " गेल्या पाच वर्षांपासून संचालक मंडळ व सचिवांनी खोटे कागदपत्रे व नातेवाईकांचे अनेक बोगस कर्ज प्रकरणे केली आहेत. खऱ्या शेतकरी सभासदाची अडवणूक करून मनमानी कारभार सुरू आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सेवा संस्थेने बनावट मतदार घूसडण्यासाठी विहित तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध न करून निवडणूक आयोगाचा भंग केला आहे. दोषींवर कारवाई करण्यात यावी अन्यथा औरंगाबाद खंडपीठात न्याय मागणार आहोत."
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी