23 वर्षीय राहुल कदम यांची रायगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

By : Polticalface Team ,Thu Apr 28 2022 14:41:54 GMT+0530 (India Standard Time)

23 वर्षीय राहुल कदम यांची रायगव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील रायगव्हाण येथील सरपंच पदाची निवडणूक नुकतीच पार पडली रायगव्हाण चे पहिले सरपंच संजय पोपट रिकामे यांनी आपल्या सहकाऱ्यांना कामाची संधी मिळावी अशा उदार मनाने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत ठरल्या प्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर बुधवार दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी ग्रामपंचायत इथे ही निवड पार पडली, राहुल अशोक कदम यांचा सरपंच निवडीसाठी एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांना बिनविरोध सरपंच घोषित करण्यात आले. या सरपंच निवडीला निवडणूक अधिकारी म्हणून मंडलाधिकारी मिलिंद जाधव व तलाठी विजय मोरे यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक लता गायकवाड यांनी या निवडीसाठी सहकार्य केले. राहुल कदम यांच्या सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य अमोल गोरख हार्दे,व अनुमोदक उपसरपंच बाळू वाल्मीक वराळे हे होते.
यावेळी माजी सरपंच रोहिदास कदम, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश शिंदे,माजी सरपंच गोवर्धन हार्दे, सामाजिक कार्यकर्ते जयवंत रिकामे, युवा नेते अनिल पठारे, ग्रामपंचायत सदस्य तेजश्री मनोज शिंदे,ग्रामपंचायत सदस्य ललिता त्रिंबक हार्दे,शालेय व्यवस्थापन अध्यक्ष अविनाश खोसे, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगव्हाण ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा असून या सरपंच निवडीसाठी गावातील स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते व सदस्यांनी सरपंच निवडीसाठी सरपंच पद खेचून आणण्यासाठी अनेक घडामोडी झाल्या होत्या परंतु ते त्यामध्ये यशस्वी झाले नाही.
वयाच्या तेवीसाव्या वर्षी मला सरपंच पदाची ग्रामस्थांनी जि संधी दिली त्या संधीचं मी नक्कीच सोनं करणार असून गावातील रस्ते,पाणी,घरकुले, लाईट,सांडपाणी व्यवस्थापन,वृक्षारोपण, इत्यादींवर विकासाचा भर देणार आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार आहे :- राहुल अशोक कदम ( नवनिर्वाचित सरपंच रायगव्हाण )

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी