By : Polticalface Team ,Thu Apr 28 2022 17:37:06 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी श्रीगोंदा शहरात वास्तव्यास असलेला महेश राऊत याने एक अल्पवयीन (16 वर्ष 7 महिने वय) असलेली मुलगी फूस लावून पळवून नेली आहे.
याबाबत आज दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यात त्यांनी उल्लेख केला आहे की, महेश राऊत हा मुलीशी सर्रास जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता. त्याबाबत आमची हरकत होती. मुलीने तिचे आईला महेश मला फिरायला जाऊ असे म्हणत होता..! असे सांगितले होते. दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी आलेल्या मुलीच्या वडिलांनी मुलीच्या आईला मुली बाबत विचारले तर, ती घरात आढळून आली नाही. त्यावर आसपास व नातेवाईकांकडे चौकशी केली तर, तेथेही आढळून आली नाही.!
यावरून नमूद महेश राऊत यावरील संशय बळावून, त्याने अज्ञात कारणाकरिता फूस लावून मुलीला पळून नेले बाबत मुलीच्या वडिलांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवि कलम 363 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस प्रशासन चौकशी करत आहे.
वाचक क्रमांक :