श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातील कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारे खते व बी-बियाणे याची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता कृषी विभाग व कृषी निविष्ठा विक्रेते यांनी घ्यावी - आमदार बबनराव पाचपुते
By : Polticalface Team ,Sat Apr 30 2022 13:46:36 GMT+0530 (India Standard Time)
दिनांक 29/4/2022 रोजी मौजे काष्टी येथे माननीय आमदार बबनराव पाचपुते साहेब यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्वनियोजन आढावा सभा पार पडली. या सभेसाठी माननीय उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत श्री अनिल गवळी, तहसीलदार श्री मिलिंद कुलथे, तालुका कृषी अधिकारी श्री दिपक सुपेकर, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी श्री वसंत जामदार, पंचायत समितीचे कृषी अधिकारी डॉक्टर राम जगताप व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे सर्व कृषी अधिकारी व कर्मचारी तसेच तालुक्यातील निविष्ठा विक्रेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री दिपक सुपेकर यांनी मागील हंगामात कृषी विभागाने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला, तसेच या वर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांना सोयीस्कर जावा यासाठी तालुक्याचे नियोजन चित्रफित द्वारे सादरीकरण केले. तसेच शेतकऱ्यांना खते व बियाणे यांचा वेळत व नियोजनबद्ध पुरवठा होणे साठी तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना केले बाबत सांगितले. त्यानंतर तहसीलदार श्रीगोंदा श्री मिलिंद कुलथे यांनी खते बियाणे औषधे यांचे वाटपाचे नियोजनाबाबत कृषी विभागाचे कौतुक केले. माननीय उपविभागीय कृषी अधिकारी कर्जत श्री अनिल गवळी साहेब यांनी खरीप हंगाम 2022 गाव स्तरावरून सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन केले असल्याने, या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये बी-बियाणे खते औषधे पुरवठा बाबत कोणतीही अडचण येणार नसल्याचे सांगितले. तालुका कृषि निविष्ठा पुरवठा यांचे श्री सुनिल ढवळे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना वेळेत निविष्ठा व दर्जेदार सेवा देणेबाबत ग्वाही दिली. माननीय आमदार बबनराव पाचपुते साहेब यांनी कृषी विभागाच्या कामाचे कौतुक केले, तसेच कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे बाबत अपेक्षा व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करून तंत्रशुद्ध पद्धतीने बाजाराचा अंदाज घेऊन उत्पन्न दुप्पट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. येत्या खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस पडून रोगराई व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी पुढील खरीप हंगामाच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीगोंदा पंचायत समितीचे कृषी अधिकारी डॉक्टर राम जगताप यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्ताराधिकारी श्री बनकर साहेब यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार बबनराव पाचपुते दादा यांच्या शुभहस्ते कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर व कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने श्री बारकू सोपान रणपिसे, श्री मोतीराम रामचंद्र जंगले, श्री दत्तात्रय बापूराव राहिंज, श्री ईश्वर शहाजी माने आदींना साहित्य वाटप केले. यावेळी बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य व परिक्रमा शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रतिभा ताई पाचपुते, श्रीगोंदा कारखान्याचे संचालक श्री सावता शेठ हिरवे, प्रगतशील शेतकरी श्री मारुतराव औटी, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाचपुते, चेअरमन श्री बबनराव राहिंज, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन वैभव दादा पाचपुते, माजी चेअरमन श्री बाळासाहेब दांगट, रायगव्हाण चे माजी सरपंच मोहनराव हार्डे, माजी सरपंच सुदामराव नलावडे, उत्तमराव परकाळे, अण्णासाहेब शेलार, उद्योजक श्री विक्रम पाचपुते, श्री कुलदीप देशपांडे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.