आष्टीत जलसिंचन विहिरी व शेत तलावांच्या कामांत अनियमितता मनसेचे कैलास दरेकर यांचा आरोप, दोषींवर कारवाईची मागणी

By : Polticalface Team ,Sun May 01 2022 16:26:46 GMT+0530 (India Standard Time)

आष्टीत जलसिंचन विहिरी व शेत तलावांच्या कामांत अनियमितता मनसेचे कैलास दरेकर यांचा आरोप, दोषींवर कारवाईची मागणी आष्टी, दि. 1 (प्रतिनिधी) - महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आष्टी तालुक्यात सुरू असलेल्या जलसिंचन विहिरी व शेततलावांची कामे आर्थिक तडजोडीतून सुरू असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी त्वरित कार्यवाही न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे, की महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आष्टी तालुक्यात सध्या जलसिंचन विहीरी व शेततलावांची कामे पंचायत समितीमार्फत हाती घेण्यात आलेली आहेत. या कामांना आर्थिक तडजोडींतून मान्यता देण्यात आल्याचे समोर येत आहे. गटविकास अधिकारी यांनी जलसिंचन विहिरी व शेततलावांच्या कामांची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. मात्र, प्रस्ताव मागणीसाठी कोणतीच प्रसिद्धी गेली नाही. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती नेमकी कशी झाली साध्य झाली या उद्दिष्टपूर्तीची चौकशी करावी, मागणी यापूर्वीच केली असून त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. वरील आर्थिक गैरव्यवहारांची व कामांतील अनियमिततेची चौकशी तत्काळ करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती रोजगार हमी मंत्री, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. (चौकट1) आर्थिक तडजोडीची आडिओ क्लिप व्हायरल या कामांबाबतच्या आर्थिक तडजोडी सुरू असून गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे व तांत्रिक अधिकारी कोळेकर यांनी लाभार्थी महेश सोले यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे साधलेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या क्लिपवरून या योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप चौकशीकामी सादर करण्यात येतील, असेही निवेदनात म्हटले आहे. (चौकट2) मजुरांकडे काम मागणीसाठी 500 रुपयांची मागणी जलसिंचन विहिरी व शेततलावांच्या सुरू असलेल्या कामांची मागणी पंचायत समितीत सादर करण्यासाठी गेलेल्या मजुरांकडे प्रतिमागणी 500 रुपयांची मागणी लाभार्थींकडे करण्यात येत आहे, अशा लाभार्थींच्या तक्रारी आहेत. अधिकारी व कर्मचार्यांीच्या या खाबुगिरीमुळे गरजू लाभार्थींना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. पैसे दिल्याशिवाय मग्रारोहयोची कामे होत नसल्याचे दिसून येते. जलसिंचन विहिरींना भुजल प्रमाणपत्रांशिवाय मंजुरी दिली गेली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष