रमजान ईद निमित्त गरजूंना शिधा वाटप
हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य कार्यक्रम
By : Polticalface Team ,Mon May 02 2022 11:59:08 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा:- प्रतिनिधि
रमजान ईद निमित्त दरवर्षी हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने रमजान ईद निमित्त किराणा मालाचे कीट समाजातील गरजूवंताला युवा नेते अमीरशेठ तांबोळी यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले यावेळी एजाज तांबोळी. जमीर सय्यद, वाजीद शेख ,फारूक जमादार ,हाजी फारूक बेग, मजहर नालबंद, मोहसीन पठाण ,सद्दाम शेख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी झालेल्या शिधा वाटप कार्यक्रमात बोलताना मा. तांबोळी म्हणाले की आम्ही हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने दरवर्षी समाजातील अनेक गरजूंना रमजान ईद निमित्त किराणा मालाचे वाटप करतो गेल्या काही वर्षांपासून तांबोळी बंधू यांच्या तर्फे समाजाची बांधिलकी म्हणून समाजाचे आपण काही तरी देणेकरी आहोत ही भावना मनात ठेवून ट्रस्टच्या माध्यमातून अनेक गरजू वंताला मदत करतो आणि यापुढे ही करत राहु असे ते यावेळी म्हणाले
वाचक क्रमांक :