महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या संघर्ष लढ्याला यश

By : Polticalface Team ,Mon May 02 2022 14:44:36 GMT+0530 (India Standard Time)

महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या संघर्ष लढ्याला यश बीड प्रतिनिधी: OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून १३ मार्च २०२२ पासुन गेल्या ४४ दिवसापासून आझाद मैदान मुंबई येथे महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन आंधळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालु आहे. महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोशीयारी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या सर्वांना व इतर 60 ते 70 आमदार - खासदार व मंत्री या सर्वांना निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेट घेऊन महाज्योती संस्थे अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर नितीन आंधळे यांनी चर्चा केली होती. महाज्योती संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज़ाद मैदानात चालू असलेल्या आंदोलनाच्या दबावामुळे अनेक विद्यार्थी हिताचे निर्णय घेण्यात आले. महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या दबावामुळे दबावामुळे महाज्योती संस्थेने OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील PhD-M.Phil च्या संशोधक विद्यार्थ्यांना मे २०२२ पासून ३१००० रुपये प्रति महिना Fellowship देण्याचे मान्य केले आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांची तयारी करणाऱ्या OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील प्रत्येकी १५०० विद्यार्थ्यांना ऑफलाइन क्लास व अनुक्रमे १२००० रुपये प्रति महिना व १०००० रुपये प्रति महिना मासिक विद्यावेतन देण्याचे महाज्योती संस्थेने मान्य केले आहे. येणाऱ्या काळात महाज्योती संस्थेमार्फत OBC, VJ NT, SBC प्रवर्गातील ५००० विद्यार्थ्यांना मोफत पोलीस भरती चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेच्या तुलनेत महाज्योती संस्थेने PhD व M.Phil च्या विद्यार्थ्यांना जी Fellowship देण्याचे मान्य केले आहे ती कमी असल्याने विद्यार्थ्यांमध्ये महाज्योती संस्थेच्या संचालक मंडळाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. २०२१ च्या महाज्योती संस्थेच्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षा साठीच्या प्रशिक्षणासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लास व मासिक विद्यावेतन न दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. प्रस्थापित समाजाला ताटात आणि भटके-विमुक्त, मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना ओंजळीत वाढायचे धोरण हे महाविकास आघाडी सरकार राबवत आहे. OBC मंत्री विजय वडेट्टीवार व महाज्योती चे संचालक मंडळ इतर समाजाच्या तुलनेत ओबीसी विद्यार्थ्यांना दुय्यम व सापत्न वागणूक देण्याचे धोरण राबवत असल्याची टीका नितीन आंधळे यांनी केली आहे. महाज्योती संस्थे द्वारा UGC च्या नियमानुसार सारथी व बार्टी संस्थे प्रमाणे PhD विद्यापीठाकडे नोंदणी दिनांकापासून संशोधन काळात पहिली दोन वर्षे ३१००० रुपये प्रति महिना व इतर भत्ते आणि शेवटची तीन वर्षे ३५००० रुपये व इतर भत्ते या प्रकारे Fellowship मिळावी यासाठी पुढील संघर्ष चालु राहील असा इशारा महाज्योती विद्यार्थी संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.