सामाजिक सलोखा बिघडवुन धार्मिक, जातीय ताणतणाव निर्माण करणारांवर कठोर कारवाईसाठी दिरंगाई करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी संविधान पठण आंदोलन

By : Polticalface Team ,Mon May 02 2022 14:54:51 GMT+0530 (India Standard Time)

सामाजिक सलोखा बिघडवुन धार्मिक, जातीय ताणतणाव निर्माण करणारांवर कठोर कारवाईसाठी दिरंगाई करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी संविधान पठण आंदोलन बीड: महाराष्ट्र राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवुन धार्मिक, जातीय ताणतणाव निर्माण करणारांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासह शासकीय कामात दफ्तर दिरंगाई करणा-या शासकीय आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी तसेच बीड नगरपरीषदेतील अनागोंदी कारभार व गैरव्यवहार प्रकरणात उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी यासह शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत आदि अन्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून"भारतीय संविधान पठण आंदोलन करण्यात आले आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, शेख मुबीन, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा हमीदखान पठाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, पत्रकार शेख जावेद शेख रज्जाक, जिल्हाध्यक्ष आप माजी सैनिक अशोक येडे, सचिव रामधन जमाले, शहराध्यक्ष सादेक सय्यद, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना कुलदीप करपे आदि सहभागी होते, निवेदन पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना.संजय बनसोडे यांना देण्यात आले. बीड नगरपरीषदेतील अस्वच्छता, पाणीटंचाई, अनागोंदी कारभार,महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे व भ्रष्टाचार प्रकरणात कारवाईसाठी ना. संजय बनसोडे यांना निवेदन. ______ बीड शहरातील अमृत अटल पाणीपुरवठा योजना तसेच भुयारी गटार योजनेची कामे मुदत संपुनही पुर्ण झाली नसुन टॅकर लाॅबीमुळे कृत्रिम पाणीटंचाई करण्यात येत असून घनकचरा बिंदुसरा नदीपात्रात टाकुन प्रदुषित पाण्यामुळे रोगराई पसरून नागरीकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल संबधित प्रशासकीय आधिका-यांवर तसेच घनकच-याची विल्हेवाट लावण्यात कसुर करणा-या अमरावती येथील कनक एन्ट्रप्रायजेस ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी. तसेच बीड शहरातील शासकीय कार्यालये उदाहरणार्थ जिल्हाधिकारी,पंचायत समिती, जिल्हापरीषद, बसस्थानक आदि ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नसुन संबधित विभागांना निवेदन आंदोलनानंतर सुद्धा सुधारणा होत नसुन संबधित प्रकरणात आवश्यक कारवाई करण्यात यावी. तसेच महिलांची स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली नसल्यामुळे कुचंबना होत असून बीड शहरातील नगररोड वरील शासकीय कार्यालयासमोर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत तसेच खोटी माहिती प्रसिद्ध करून शासनाची दिशाभूल करून ओडीएफ प्लस प्लस मानांकन व स्वच्छता सर्व्हेक्षण २०२०-२१ मध्ये ६७ वा क्रमांक केल्याबद्दल मुख्याधिकारी नगरपरिषद बीड डाॅ.उत्कर्ष गुट्टे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा येऊन स्वतंत्र उच्च स्तरीय कमिटीमार्फत प्राप्त मानांकनाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ना. संजय बनसोडे यांना करण्यात आली आहे. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष