दादापाटील राजळे महाविद्यालयात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन
By : Polticalface Team ,Mon May 02 2022 15:21:32 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
भारत सरकारच्या पंडीत मदन मोहन मालवीया नॅशनल मिशन ऑन टीचर्स ॲण्ड टिचींग या योजनेअंतर्गत दादापाटील राजळे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आदिनाथनगर आणि श्री गुरु तेज बहादूर खालसा महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ यांचे गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रिसेंट ट्रेंड्स इन टिचिंग लर्निंग प्रोसेस या विषयावर नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन सात दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंन्ट प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील प्रोग्रॅममध्ये दिल्ली, हरियाना, केरळ, गोवा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंड व महाराष्ट्र अशा विविध राज्यातुन १९८ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.
सात दिवसांच्या या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवर संसाधन व्यक्ती म्हणुन लाभले. यामध्ये पहिल्या दिवशी गुरु अंगददेव टीचिंग लर्निग सेंटरचे अध्यक्ष व पी.डी.एम. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ए. के बक्षी यांनी लर्नर सेंट्रीक एज्युकेशन फॉर २१ सेंच्युरी लर्निंग नीड यावर व्याख्यान दिले. गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटरच्या प्रोजेक्ट हेड प्रा. विमल रहा यांनी मेथोडोलॉजी ऑफ कन्टेन्ट डेव्हलपमेंट फोर कॉड्रन्ट मॉड्यूल, प्रा. पीयूष पहाडे यांनी एक्सपिरीयन्शीयल लर्निंग, प्रा. श्रीहरी पिंगळे यांनी ऍडव्हान्स लर्नर अँड स्लो लर्नर, डॉ. एम.एल. डोंगरे यांनी गिअर अप रिसर्च ॲटीट्युड, डॉ. रुपेश थोपटे यांनी टेक्निक्स ऑफ योगा, डॉ. श्रीशा गिजारे यांनी न्यूट्रिशन फॉर टीचर, डॉ. दीपक ननावरे यांनी अटेनमेंन्ट ऑफ कोर्स आऊटकम्स, प्राचार्य डॉ. एस.एल. लावरे (सोनई) यांनी पेटंट रजिस्ट्रेशन, प्राचार्य डॉ. संजय चाकणे (इंदापूर, पुणे )यांनी रोल ऑफ टिचर इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी व प्राचार्य डॉ. बी. वाय. देशमुख (राजुर,अकोले.) यांनी फीचर्स ऑफ नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या विषयांवर व्याख्याने दिली.
समारोपाच्या प्रसंगी श्री गुरू तेज बहादुर खालसा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जसविंदर सिंग, गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटरचे अध्यक्ष व पी.डी.एम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ए. के बक्षी, गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटरच्या प्रोजेक्ट हेड प्रा.डॉ. विमल रहा तसेच दादापाटील राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर, आय. क्यू. ए. सी. समंन्वयक प्रा. राजु घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. डॉ. ए. के बक्षी यांनी प्राध्यापकांशी संवाद साधतांना प्राध्यापकांनी विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणातील नवीन ट्रेंडचा वापर आपल्या अध्यापनात केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. या वेळी प्राचार्य डॉ. आर. जे. टेमकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले . कार्यक्रमाचे आभार समन्वयक शा. शि. संचालक रोहित आदलिंग यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोरकुमार गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दादापाटील राजळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिकाताई राजीव राजळे, राहुल राजळे, सचिव श्री. जे. आर. पवार तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष शिवाजीराव राजळे यांचे प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. आर.जे. टेमकर यांनी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर कार्यालयीन अधिक्षक विक्रमराव राजळे यांचे सहकार्य लाभले. आयोजन समितीमधील डॉ. अतुलकुमार चौरपगार, डॉ. ज्ञानदेव कांडेकर, प्रा. आसाराम देसाई, प्रा. चंद्रकांत पानसरे, प्रा. योगीता इंगळे व गुरु अंगददेव टिचिंग लर्निग सेंटरच्या प्रा. हिमांशी त्यागी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.