महावितरणकडून देवीचंद सरोदे व चंद्रकांत सुरवसे यांना गुणवंत तांत्रिक कामगार पुरस्काराने सन्मानित
By : Polticalface Team ,Mon May 02 2022 18:43:56 GMT+0530 (India Standard Time)
कर्जत प्रतिनिधी (सागर डाळिंबे): तालुक्यातील कर्जत उपविभाग कुळधरण उपकेंद्र येथील यंत्रचालक चंद्रकांत सुरवसे व कर्जत कक्ष 2 कर्जत उपविभाग येथील तंत्रज्ञ देविचंद सरोदे यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या नाशिक परिमंडल,नाशिक यांच्याकडून 1 मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिन च्यादिवशी महावितरण कंपनीकडून सन 2021- 22 या वर्षामध्ये महावितरण कंपनीमध्ये उत्कृष्ट व मोलाचे काम केल्यामुळे गुणवंत तांत्रिक कामगार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक विभागाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर व मान्यवर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.महावितरण मध्ये केलेली उत्कृष्ट कामगिरी आणि पुढील काळामध्ये महावितरणच्या सर्वांगीण विकासासाठी अशीच सेवा लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी कर्जत विभागाचे अधिकारी,पदाधिकारी, कर्मचारी व मित्रपरिवार यांनी सुरवसे व सरोदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
वाचक क्रमांक :