महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करू नका - मंत्री छगन भुजबळ
                      
                
            
               By : Polticalface Team ,Mon May 02 2022 23:36:09 GMT+0530 (India Standard Time)
       
               
                           
              नाशिक,येवला, दि.२ मे :- देशात खोटा इतिहास लोकांना सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात मात्र ज्यांनी आपलं कर्तृत्व गाजविलं त्यांच्याच खरा इतिहास समोर उभा आणला जाईल. देशात शेतकरी, महागाई अडचणींवर पांघरून टाकण्यासाठी भोंग्यांचा प्रश्न पुढे आणला जात असून महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करू नका असा इशारा देत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय उत्तमपणे सांभाळत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी राज्याचा कारभार करत असतांना अडचणी निर्माण करून मनाचा कोतेपणा दाखवू नये अशी टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, पंकजभुजबळ,आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, माजी आमदार मारोतीराव पवार,कल्याणराव पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी लीना बनसोड,  ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, संभाजी पवार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, शिवसेना तालकाप्रमुख रतन बोरनारे,माजी नगराध्यक्ष हुसेन शेख,  बाळासाहेब कर्डक, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, भाऊसाहेब भवर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, शहराध्यक्ष दिपक लोणारी,  ज्ञानेश्वर शेवाळे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे,सचिन कळमकर, राजेश भांडगे, संतोष खैरनार, पंकज काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, व्ही.बी.पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहे. मात्र छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राज ठाकरे का घेत नाही ? असा सवाल उपस्थित करत राज्यात केवळ तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्याकडून करून करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली. ते म्हणाले कीज्या संभाजी भिडे यांची संपूर्ण हयात ही मुस्लिम द्वेष करण्यात गेली.  काही दिवसांपूर्व त्यांचा अपघात झाला त्यांना भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. रियाज उमर मुजावर यांना वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग कार्य केल्याबद्दल नेल्सन मंडेला यांच्या नावाने मिळणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार होता मात्र तिकडे न जाता त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर उपचार केले. तर केवळ माणुसकीच्या धर्मातून हे भिडे यांनी समजून घ्यावी असेही ते म्हणाले.
ते म्हणाले सद्या लोकमान्य टिळकांनी रायगडावर छत्रपती शिवाजी यांची समाधी बांधली असा प्रचार केला जात असून पुरंदरे, स्वामी, टिळक यांना मोठं करायचं आणि शरदचंद्र पवार यांना जातीयवादी ठरविण्याचा कट केला जात आहे. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावरच छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले, अंतिम संस्कारानंतर  तिथेच त्यांची समाधी बांधण्यात आली होती, पुढे छत्रपती  संभाजी महाराजांची  राजवट आली, संभाजी महाराजांनंतर ला रायगड किल्ला मोघलांनी जिंकला आणि त्यांनी त्याचे नाव इस्लामगड केले. पुढे हा किल्ला मोघलांच्या ताब्यात होता, पेशव्यांनीतो परत जिंकला, तो पर्यंत समाधीचा उल्लेख सापडत नाही. १० मे १८१८ मध्ये इंग्रज कर्नल फ्रॉथरने तो ताब्यात घेतला आणि १८१९ मध्ये कोलाबा गॅजेटमध्ये शिवसमाधीचा पहिल्यांदा उल्लेख आला. पुढे राजयगडाचा पूर्ण नकाशा आणि अंदाज घेऊन इंग्रजांनी पुन्हा मराठे साम्राज्य उभारतील या दृष्टीने सर्व किल्ले निर्मनुष्य केले, त्यानंतर अनेक वर्षे तो किल्ला ओस पडला, त्यांनतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी १८७९ समाधी शोधली आणि त्यावर पोवाडा लिहिला. त्यावेळेस टिळक १३ वर्षांचे होते असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, रायगडावरील छ. शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक व  समाधी जीर्णोद्धार व्हावा म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे वडील आबासाहेब घाडगे यांची ईच्छा होती, त्यांनी तसे जाहीर केल्यानंतर टिळकांनी लगेच हिंदू महासभेची सभा बोलवून आम्ही लोकवर्गणीतून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करू जाहीर केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ निधी" नावाने आयुष्यभर निधी गोळा केला. शाहु महाराज यांनी देखील लोकमान्य टिळक यांना मदत केली आहे. आणि आपल्या उभ्या हयातीत त्यांनी रायगडावर एक खडा देखील बसविला नाही.१९२६ ला इंग्रजांच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी टिळकांच्या स्मारक समितीला पत्र देऊन स्मारकाबाबत विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उत्तरात बँक बुडाली उघड झाले, मग इंग्रजांनीच छत्रपती शिवाजी समाधीचे काम हाती घेतले मूळ अष्टकोनी चौथरा मग त्यावर छोटा अष्टकोनी चौथरा आणि त्यावरच राजपूत पद्धतीचे छत्र हे इंग्रजांनी बांधले ते १९२७- २७ दरम्यान. मग याशी टिळकांचा संबंध एवढाच कि त्यांनी केवळ पैसे गोळा केले आणि ते दुसरीकडे वळवले, याचे सर्व पुरावे आणि उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, येवला शहर हे थोर स्वातंत्र्य सेनानी सेनापती तात्या टोपे यांची येवला ही जन्मभूमी असून त्यांच्या स्मारकाचा देखील आपण विकास केलेला आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा याच येवले शहरात केली. त्यामुळे या भूमीला जागतिक असे महत्व प्राप्त झाले असल्याने याठिकाणी येवला मुक्ती भूमीचा विकास आपण केलेला आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर आदी कर्तुत्ववान व्यक्तींची स्मारके व इतर वैशिष्ट्यपूर्ण कामे झालेली आहे. पैठणीमुळे येवल्याची जगभर ओळख झाली असून पर्यटनासाठी अनकाई किल्ला, वन पर्यटनासाठी राजापूर ममदापूर पर्यटन क्षेत्र, त्याचप्रमाणे कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, बोकटे येथील कालभैरव मंदिर, अंदरसूल येथील नागेश्वरी मंदिर हे प्रसिद्ध स्थळे येथे आहेत त्यांचाही विकास आपण केलेला आहे. 
ते म्हणाले की, या ऐतिहासिक येवला शहराच्या लौकीकात आणखी भर पडण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवरायांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनांचे म्युनरल्सद्वारे शिवसृष्टी उभारण्याचा आपला प्रयत्न होता.  केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विकसित न करता सर्व मावळ्यांचा इतिहास उभा यामाध्यमातून करण्यात येत आहे. या प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा सिंहासनाधिष्टीत मेघडंबरीसह भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी व महाराजांच्या सेनापतींचे चित्रशिल्प भित्तीचित्रे, ऑडिओ व्हिडिओ हॉल, शिवकालीन शस्रारांचे प्रदर्शन, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, माहिती केंद्र आणि कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार व अनुषंगिक मांडणी,वाहनतळ, शिवसृष्टी आवारात उद्यान, टप्पे स्वरूपातील कारंजे व सुशोभीकरणाच्या अनुषंगिक बाबी, स्वच्छतागृह व उपहारगृह, परिसरात अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, पाणीपुरवठा  मलनिःसारण इत्यादी कामे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार नरेंद्र दराडे, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा अध्यक्ष वसंत पवार यांनी केले.
मराठी इंडियन आयडॉल स्पर्धेतील नाशिक जिल्ह्यातील स्पर्धकांचा सन्मान
मराठी इंडियन आयडॉल सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रतिक सोळशे, ऋषिकेश शेलार, आम्रपाली पगारे या स्पर्धकांचा मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी या स्पर्धकांनी उपस्थितांसमोर गाण्याचे सादरीकरण केले.
लोकशाहीर नंदेश उमप यांच्या शाहिरी जलस्याने जिंकली शिवप्रेमीची मने
येवला शिवसृष्टी भूमिपूजन कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध लोकशाहीर नंदेश उमप यांच्या शाहिरी जलस्याचा कार्यक्रम शिवप्रेमीसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी नंदेश उमप यांच्या शाहिरी जलस्याच्या अप्रतिम अशा सादरीकरणातून उपस्थित शिवप्रेमींची मने जिंकली.
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष