गरीब असल्याचे दाखवा सरकार पैसे देते या बहाण्याने वृध्द दांपत्याला लुटले: श्रीगोंदयात गुन्हा दाखल
By : Polticalface Team ,Thu May 05 2022 12:43:36 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी दि.४: ईद सणाच्या निमित्ताने गरिबांना पैसे मिळत आहेत...तुम्ही गरीब दिसले पाहिजेत.. म्हणत अंगावरील दागिने काढून पाकिटात ठेवायला सांगितले व हातचलाखी करत भामट्याने लंपास केले. घटना श्रीगोंदा तहसील कार्यलयाच्या आवारात घडली आहे. याबाबत वृध्द दाम्पत्याने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवार दि. २ मे रोजी होळी गल्ली येथील रहिवासी असलेल्या पापाभाई रहेमान सय्यद यांना व त्यांच्या पत्नी चाँदबी पापाभाई सय्यद यांना श्रीगोंदा तहसीलमध्ये नेऊन एका अनोळखी इसमाने त्यांच्या मुलांचा दोस्त असल्याचे सांगून उद्या असलेल्या रमजान ईद सणानिमित्त सरकार १० हजार रुपये देत आहे. यासाठी अंगावरील दागिने काढून ठेवा..! आपण गरीब वाटलो पाहिजेत..! असे भासवून, रोख रक्कम आणि दागिने पाकिटात ठेवल्यानंतर ते लंपास केले आहेत.
याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे की एका अज्ञात इसमाने चाचाला सोबत घेऊन मला तहसील कार्यालयासमोरील झेंडया खाली बसवले. अंगावरील दागिने काढून दागिन्याचे पाकिट चाचाकडे दिले. त्यांना घेऊन तो इसम तहसील कार्यालयाच्या गेट जवळ गेला. काही वेळाने चाचा परत आले व त्यांनी त्या अनोळखी इसमाने दागिन्यांचे पाकीट तुझ्याकडे दिले का..? असे विचारले... तो परत आला नाही म्हटल्यावर मात्र, पाकीट चोरीला जाऊन आपली फसवणूक झाल्याचे अन विश्वासाघात झाल्याचे लक्षात आले व अनोळखी इसमाने दागिने चोरल्याची त्यांची खात्री पटल्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सय्यद यांनी त्या अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.
वाचक क्रमांक :