पाटोद्यातील दर्गाची जमीन घेणार मोकळा श्वास

By : Polticalface Team ,Sat May 07 2022 01:03:07 GMT+0530 (India Standard Time)

पाटोद्यातील दर्गाची जमीन घेणार मोकळा श्वास पाटोदा / प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनी खालसा व मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत. त्याविरोधात वक्फ बोर्डाने जिल्यात ठिकठिकाणी मोहीम राबविली आहे.त्यामधेच पाटोदा शहरातील ह.राजमोहमंद साहाब यांची दर्गा स.न.७१४ मध्ये ६ एक्कर ३५ गुंठे जमीन आहे त्याची नोंद शासनाच्या राज्यपत्रात अनुक्रमाक २० वर असुनही या जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. या विरोधात दर्गाचे खिदमतगार बशीर इमामशहा सय्यद यांनी पाटोदा तहसीलदार यांच्या मार्फत मा.बीड जिल्हाधीकारी,मा.उपविभागीय अधिकारी,वक्फबोर्ड बीड व औरंगाबाद यांना केली होती. या बातमी संदर्भात पत्रकार जावेद शेख यांनी अवैध बांधकामाचे फोटो काढले असता अवैध बांधकाम करणाऱ्यांनी फोटा का काढले म्हणत पत्रकारावर जिवघेना हल्ला केला.या विरोधात पाटोदा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या बातमीला बीड जिल्ह्यातील विविध दैनिकातुन प्रसिद्धी मिळाली होती.या बातम्यांचा व तक्रारीचा बोध घेत.बुधवारी दि.४ मे रोजी ४ वाजण्याच्या सुमारास पाटोदा येथील वक्फ जमिनीची बीड जिल्हा वक्फ अधिकारी सय्यद अमिनुलज्जमा व त्यांचे सहकारी व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत पाहणी करत पाच पंचाच्या उपस्थितीत पंचनामा केला.यावेळी वक्फ अधिकारी सय्यद अमिनुलज्जमा यांनी सांगितले की जुनी नोंद अपडेट केली जाईल.व स.न.७१४ ची पुर्ण मोजणी करण्याचे आदेश दिले असून.त्यासाठी 1902 च्या सर्वेक्षणानुसार व नवीन नकाशानुसार वक्फ जमिनीचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे त्यांना ३ ते ४ दिवसांत नोटीस बजावण्यात येणार.ज्या अतिक्रमण जागेवरून वाद झाला आहे. त्यांना नोटीस बजावली आहे. ज्यांच्या ताब्यात ईनामी जमीन आहे,त्यांच्यावर कलम ५२अ आणि ५२ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात येईल.अतिक्रमण हटवण्यासाठी सरकारच्या पातळीवरून मोठी कारवाई करण्यात येईल.वक्फ जमीन लवकरच अतिक्रमणमुक्त करण्यात येईल,असे वक्फबोर्ड अधिकारी सय्यद अमिनुलज्जमा म्हणाले. जावेद शेख पत्रकारांवर याच प्रकरणात जिवघेणा हल्ला ; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ____ याच राजमहंमद दर्गाह खिदमतमास इनाम जमिन अतिक्रमित बांधकाम प्रकरणात छायाचित्रे काढल्यामुळे मराठी पत्रकार परीषद सोशल मिडीया तालुकाध्यक्ष तथा सायं.दैनिक दिव्य वार्ताचे पत्रकार शेख जावेद यांच्यावर डोक्यात लोखंडी राॅडने जीवघेणा हल्ला केला होता, संबधित प्रकरणात पत्रकार विरोधी हल्ला कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले होते, आंदोलनात पत्रकार शेख जावेद, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा हमीदखान पठाण, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष शिरूर कासार अशोक कातखडे, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, सय्यद आबेद आदि सहभागी होऊन प्रभारी पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार यांना निवेदन देण्यात आले होते. डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर मो.नं.८१८०९२७५७२
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष