बेलवंडी येथे घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन... हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा हा प्रयत्न - घनश्याम शेलार

By : Polticalface Team ,

बेलवंडी येथे घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन...
हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचा हा प्रयत्न - घनश्याम शेलार श्रीगोंदा:एकीकडे संपूर्ण राज्यात मशिदीवरील भोंग्याचे राजकारण तापले असताना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील गौसिया जामा मस्जिद येथे मुस्लिम समाजाने सर्व जातीधर्माच्या व्यक्तींसाठी रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. सर्वधर्मीयांसाठी यावेळी शिरखुरमा, भजे, जिलेबी, समोसे यांची खास मेजवानी करण्यात आली होती.यातूनच हिंदू मुस्लिम समाजाचे एकतेचे दर्शन संपूर्ण तालुक्याला घडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, प्रतिभाताई पाचपुते,पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, नागवडे कारखान्याचे संचालक सावता हिरवे, उपसरपंच उत्तम डाके, संग्राम पवार,व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन सोपान हिरवे, समता पतसंस्थेचे चेअरमन सुनिल ढवळे, युवराज पवार, अश्रुद्दीन हवालदार, सुभाष काळाने, दिनेश इथापे,संजय डाके, संदीप तरटे,यांच्यासह अनेक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.ईद निमित्त गौसिया जामा मस्जिद च्या बांधकामासाठी देणगी म्हणून नागवडे करखाण्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी एक लाख रुपये, माजी आमदार राहुल जगताप यांनी एकावन्न हजार रु. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी एकावन्न हजार रु. तर समता पतसंस्थेचे व्हा. चेअरमन अश्रुद्दीन हवालदार यांनी एक लाख रु. देणगी दिली. माजी आमदार राहुल जगताप व अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते ट्रस्ट चे अध्यक्ष सलीम शेख यांच्याकडे ही देणगी सुपूर्त केली. ईद निमित्त शुभेच्छा देताना घनश्याम अण्णा शेलार म्हणाले की मुस्लिम बांधवांनी एक महिन्याचा कठोर उपवास करून देशामध्ये शांतता नांदावी अशी प्रार्थना अल्लाह कडे केलेली आहे.दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर आज रमजान ईद मोठ्या आनंदाने साजरी होत आहे. परंतु काही लोकांना आताच भोंगा आठवला आहे. *चौकट - मुस्लिम समाजाच्या नमाज आणि अजाण पठण चा काही लोकांना त्रास होयला लागला आहे.खर तर महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी चा हा प्रयत्न आहे.यातून हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका घनश्याम शेलार यांनी यावेळी केली.* मुस्लिम समाजाने सामाजिक ऐक्य ठेवण्यासाठी या इफ्तार पार्टी च आयोजन केले त्याबद्दल मुस्लिम बांधवांचे आमदार राहुल जगताप यांनी आभार मानले. चौकट - जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार म्हणाले की, कोणी कितीही चिथावणीखोर भाष्य केले तरी मुस्लिम बांधवांनी संयम ठेऊन सहकार्य ची भावना ठेवली त्यामुळे सामाजिक सलोखा कायम राहिला आहे. त्याबद्दल मुस्लिम बांधवांचे अण्णासाहेब शेलार यांनी कौतुक केले. या इफ्तार पार्टीसाठी ट्रस्ट चे अध्यक्ष सलीम शेख,बुढन शेख, कादरभाई शेख,बबन हवालदार, फत्तुभाई शेख,जमीर हवालदार, रियाज हवालदार,अय्युब शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष