संत मंडळी, महाराज आणि पोलिस खाते दोघांचे कार्य समान-मनोज पाटील,जिल्हा पोलिस अधीक्षक, नगर
By : Polticalface Team ,Fri May 13 2022 16:11:31 GMT+0530 (India Standard Time)
समाज प्रबोधन आणि लोकांवर संस्कार करण्याचे काम वारकरी संप्रदाय करते तसेच काम पोलीस प्रशासन करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तालुक्यातील पारगाव फाटा येथे चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगणात आयोजित तुलसी रामायण कथा व ज्ञानयज्ञ सोहळा शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.
चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती व वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तुलसी रामायण कथा व ज्ञानयज्ञ सोहळा शुभारंभ मनोज पाटील यांच्या हस्ते व आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँक संचालिका, जिल्हा परिषद सदस्या सौ.अनुराधा नागवडे,ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस,माजी पंचायत समिती सभापती शहाजी हिरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी पाटील बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले समाज सुधारावा,चांगल्या सवयी लागाव्यात हा उद्देश अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्या मागे असतो पोलीस देखील गुन्हेगारी नष्ट होऊन सामाजिक स्वास्थ्य टिकावे यासाठी प्रयत्न करत असतात अशा कार्यक्रमातुन समाज हित साधले जाते
सोहळ्याचे निमंत्रक वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी बँकिंग क्षेत्रात चांगली कामगिरी करतानाच सामाजिक बांधिलकी तुन समाज कार्य तसेच अध्यात्म क्षेत्रात चांगले कार्य केले असे गौरवोद्गार देखील मनोज पाटील यांनी काढले.तसेच मनोरंजनाची साधने कमी असताना गावोगावी सप्ताह,धार्मिक कार्यक्रम, प्रवचन यातून समाजप्रबोधन होत असे अलीकडील काही दशकात टीव्ही,मोबाईल क्रांती झाल्याने प्रगती झाली पण संस्कार बाबत आपण मागे पडलो अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.
आमदार बबनराव पाचपुते यांनी बोलताना रामायण आपल्याला भावाने भावाशी कसे वागावे,बापाने मुलासाठी काय करावे व मुलाने बापासाठी काय करावं हे शिकवते असे सांगून रामायण ऐकावं ते रामराव महाराज ढोक यांच कारण ते सर्वांना समजत . अध्यात्मिक कार्यक्रमामुळे संस्कार होतात सध्या याची गरज असल्याचे सांगितले.
सौ.अनुराधाताई नागवडे यांनी बोलताना काम करताना निस्वार्थी भावना असेल सामाजिक बांधिलकी असेल तर कार्य पार पडते हे दोन्ही गुण विठ्ठलराव वाडगे यांच्यामध्ये असल्याने बँकिंग आणि सामाजिक क्षेत्रात मोठी कार्ये वाडगे यांनी पार पाडली अनेक दिग्गजांना न जमणारे धार्मिक कार्यक्रम वाडगे यांनी आयोजित केले याचे कौतुक केले
यावेळी कथा प्रवक्ते रामयणाचार्य हरी भक्त परायण रामराव महाराज ढोक यांनी आपल्या मधुर वाणीतून सेवेला सुरुवात केली.
यावेळी विठ्ठलराव वाडगे,शुभम वाडगे,पुण्यातील आयुर्वेदाचार्य डॉ.शिल्पा थोरात,श्रीगोंदयाचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,शरद गावडे,सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शरद गावडे यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.