करमाळा मुस्लीम सामाज बांधवांकडून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी

By : Polticalface Team ,Sat May 14 2022 18:23:59 GMT+0530 (India Standard Time)

करमाळा मुस्लीम सामाज बांधवांकडून छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करमाळा दि.१४ प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती करमाळा च्या वतीने शहरातील पोथरेनाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास्थळी करमाळा शहरातील मुस्लीम समाजातील करमाळा मुस्लीम सामाजिक व आर्थिक उन्नती अभियान, बहुजन विकास संस्था, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा, मुस्लीम विकास परिषद, रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी भेट देऊन छत्रपती संभाजी महाराज यांची ३६५ वी जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी संभाजी महाराजांच्या पुतळ्यास मुस्लीम समाजाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण म्हणाले कि, छत्रपती संभाजी महाराज हे अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. संभाजी महाराजांनी शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारे छत्रपती संभाजी महाराज उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार होते. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. अशा या महान शूरवीराचा आदर्श युवापिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. यावेळी मुस्लीम विकास परिषद अध्यक्ष तथा न.प. दक्षता समितीचे सदस्य हाजी फारूक बेग, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे कार्याध्यक्ष कय्युम शेख, पत्रकार अलीम शेख, अलीम खान, दस्तगीर पठाण, अझीम मोगल, बबलू पठाण, युसुफ शेख सर, आयुब शेख, जमील काझी, जमीर मुलाणी, राजू सय्यद, अकबर सय्यद, अश्रफ तांबोळी, अमीर मोमीन, अमीर शेख, एजाज शेख, फुरकान काझी, कचरू मिर्झा, मुजम्मील शेख, मातीन बागवान, जावेद मणेरी, राजू कुरेशी, बशीर अतार, मतीन अतार, शाहरुख नालबंद, राजू नालबंद, फिरोज मुलाणी, राजू मुलाणी, गुलाम सय्यद, अमीन बेग, तौफिक शेख, आशिश पठाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात मुस्लीम बांधव उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी