केडरला जोडल्यास संचालक मंडळ, सचिव बनणार बाहुले तर शेतकऱ्यांना बाहेरच्यांचे उंबरे झिजवावे लागणार
By : Polticalface Team ,Sat May 14 2022 18:50:19 GMT+0530 (India Standard Time)
गुंडेगाव (प्रतिनिधि दादासाहेब जावळे):
सेवा सोसायटी हा शेतकऱ्यांचा प्राण. कोणाचीही विनवणी न करता आपल्या सातबारावर कर्ज देणारी संस्था. या संस्थेला स्थैर्य देण्याचे, अंकुश ठेवण्याचे काम लोकमतातून निवडून आलेले प्रतिनिधी करतात. मात्र ही संस्था आपल्या हाती यावी, शेतकऱ्यांची कर्जवाटपाची नाडी आखडता यावी, आपल्या होकार नकारावर कर्ज वाटप व्हावे व शेतकऱ्यांने आपल्या पायी लोटांगण घालावे म्हणून गुंडेगाव सेवा सोसायटी केडरला जोडून आपल्या हाती घेऊ पाहणाऱ्या, गुंडेगावच्या शेतकऱ्यांच्या मुसक्या आवळू पाहणाऱ्या *बाहय शक्तीनां* सत्ता देणार की *शेतकरी हितासाठी अहोरात्र लढणाऱ्या, झगडणाऱ्या गुंडेगावच्या भूमीपुत्राच्या हाती* सत्ता देणार हे मतदार राजानी ठरवायचे आहे.
सेवा सोसायटीवर शासनाच्या *डीडीआर* यांचे नियंत्रण असते. त्यामुळे शासनाच्या निर्णयाला बांधिल राहत सेवा सोसायट्यांचे कामकाज चालते. *केडर* ही मात्र जिल्हयातील सोसायटी सचिवांनी स्थापन केलेली खाजगी संस्था असून या संस्थेचा प्रमुख हा *जिल्हा बँकेचा डायरेक्टर* असतो. कोणाला कर्ज द्यायचे कोणाचे रोखायचे, कोणाला सभासद करावयाचे हे सर्व अधिकार *जिल्हा बँक डायरेक्टरच्या* हाती असतात. त्यामुळे शेतकऱ्याची अडवणूक करण्याचे काम अनेक ठिकाणी अशा व्यक्तीमार्फत झालेले असून गुंडेगाव सेवा सोसायटी ही केडरला जोडण्याचा डाव असून थोड्याशा लालचेपोटी *बाह्य शक्तींच्या हाती* सत्ता खरच मतदार देणार की *निवडून दिलेल्या संचालक मंडळाच्या म्हणजेच "आपल्या माणसांच्या हाती"* सत्ता देणार हे सुज्ञ मतदारांनी ठरवायचे आहे.
त्यामुळे शेतकरी हितासाठी अहोरात्र झगडणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या, लोकांची घरे न फोडता एकसंध ठेऊन "आदर्श ग्राम, समृद्ध शेती व शेतकरी" यांचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या, महाराष्ट्रात गुंडेगावला नंबर एकचा शासनाचा पुरस्कार मिळवून देणाऱ्या भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलला* मतदान करणार हे सुज्ञ मतदाराने ठरवायचे आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी