गुंडेगावात प्रचाराच्या तोफा थंडावल्या.. आरोप प्रत्यारोपाने गाजलेल्या निवडणूकीत कोण मारणार बाजी?

By : Polticalface Team ,Sun May 15 2022 09:51:47 GMT+0530 (India Standard Time)

गुंडेगावात प्रचाराच्या तोफा थंडावल्या.. आरोप प्रत्यारोपाने गाजलेल्या निवडणूकीत कोण मारणार बाजी? गुंडेगाव ता. नगर (प्रतिनीधी दादासाहेब जावळे):येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी १ व सेवा सोसायटी २ ची रणधुमाळी थांबली असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीला जोर आला आहे. भैरवनाथ शेतकरी विकास पॅनल व रामेश्वर शेतकरी विकास पॅनल यांचेमध्ये सरळ सरळ लढत होत आहे. १ नंबर सेवा सोसायटीमध्ये १३ जागेसाठी २८ उमेदवार तर २ नंबर सोसायटी साठी १२ जागेसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. या सोसायटीत बाळासाहेब हराळ गटाचे उमेदवार दिनकर शिंदे यांचे रुपाने बिनविरोध निवडून येऊन विजयी खाते उघडले आहे. भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलने शेतकरी विकासाचा अजेंडा मांडताना मागील १५-२० वर्षात गावाने वीज, रस्ते, पाणी यात केलेल्या कामांचा उल्लेख करताना जलसंधारणच्या कामाने पूर्वीचे ७५० हेक्टर बागायती क्षेत्र आता १६०० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांची झालेली आर्थिक भरभराट, त्यामुळे उंचावलेला आर्थिक स्तर व केलेल्या विकास कामांचा उहापोह करताना सेवा सोसायटी केडरला जोडून ताबेदारी मिळविण्यासाठी गावाबाहेरील लोकांनी लक्ष घालून सेवा सोसायटीच्या प्रतिनिधींना धमकावून, लालूच दाखवून केलेल्या गुजरात वारीचा अनेकांनी खरपूस समाचार घेतला. रामेश्वर शेतकरी विकास पॅनलने शिक्षक सोसायटीचा संदर्भ देत कन्यादान योजना, विमा योजना, डिव्हीडंड, तीन मजली कार्यालयाच्या इमारत उभारणीचे आश्वासन देत निवडणूकीत काही प्रमाणात रंग भरण्याचे कार्य केले. मात्र हा निधी कसा उभारणार या बाबतचे स्पष्टीकरण मात्र देता आले नाही. ग्रामपंचायतीत याच पक्षाची असलेली सत्ता असून काम वाटप व काम घेण्यावरून सत्ताधारी सदस्यात चालू असलेली खेचाखेचीमुळे ग्रामविकासाच्या रखडलेल्या कामांमुळे व मंजुर कामांचे निधी वितरीत होऊनही प्रत्यक्षात काम न झाल्याचे आरोप रामेश्वर शेतकरी विकास पॅनलवर झाले. मात्र या बाबत कोणीही उत्तर दिले नाही. मागील जवळपास दोन पंचवार्षिक सेवा सोसायटी बीनविरोध होत होत्या. पण बीनविरोध होऊनही जिल्हा बँकेच्या ठरावाच्या वेळी व संस्था केडरला जोडण्यासाठी काही बाहेरच्या राजकीय व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केलेला सर्वसामान्य मतदाराला रुचलेले दिसले नाही. त्यामुळे तरुणांचे संघटन झालेले दिसून आले. बाळासाहेब हराळांच्या भैरवनाथ पॅनलने उच्चशिक्षीत व सोसायटीच्या कारभाराशी संबंधितांना उमेदवारी देताना जथ्ये व मतदानाचा हिशोब लक्षात घेता सोशल इंजिनीअरींगचा प्रयोग केला. बबनराव हराळ यांच्या रामेश्वर पॅनेलने रिटायर्ड शिक्षक, शेतकरी यांना स्थान देताना काही मागील सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली, तर काही जागेवर उमेदवारांनी पाय न धरल्याने विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना उमेदवारी करावी लागली. भैरवनाथ पॅनलचे वतीने मा.जि.प. सदस्य बाळासाहेब हराळ, मा. सरपंच संजय कोतकर, मा. उपसरपंच सुनिल भापकर, मा. सरपंच सौ. नयना भापकर, रावसाहेब हराळ, वामनराव जाधव, मा. सरपंच उषा जाधव, रमेश चौधरी, सुरेश हराळ, संदिप जाधव, अंबादास जाधव, अंबादास कासार, पंडीत हराळ, पोपट भापकर, अंकुश कुताळ यांनी तर रामेश्वर पॅनलच्या वतीने बबनराव हराळ, महादेव माने, महादेव चौधरी, उपसरपंच संतोष भापकर, संतोष धावडे, संतोष सकट, नानासाहेब हराळ आदींनी नेतृत्व करत पॅनलचा अजेंडा सभासदापर्यंत प्रत्यक्ष व सोशल मिडीयातून पोहचविण्याचा प्रयत्न करत आरोप प्रत्यारोप करत सभासदांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. सेवा सोसायटी १ साठी रविवारी मतदान होणार असून मतमोजणी सायंकाळी , तर सेवा सोसायटी २ साठी सोमवारी मतदान होत असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्यामुळे ग्रामविकासाचा अजेंडा प्रत्यक्षात राबवून महाराष्ट्र शासनाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला भैरवनाथ पॅनलचे नेते बाजी मारणार की इमारत, कन्यादान, डिव्हीडंड, विमा यांचे स्वप्न दाखविणाऱ्या रामेश्वर पॅनलचा विजय होणार हे अवघ्या काही तासांनी समजेल.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.