दुचाकीच्या समोरा समोर झालेल्या धडकेत 25वर्षीय युवकाचा मृत्यू:अन्य तिघे गंभीर जखमी

By : Polticalface Team ,Mon May 16 2022 11:35:48 GMT+0530 (India Standard Time)

दुचाकीच्या समोरा समोर झालेल्या धडकेत  25वर्षीय युवकाचा मृत्यू:अन्य तिघे गंभीर जखमी प्रतिनिधी ( तनवीर त जमादार): 14मे सायंकाळी 7 वा. 30 मिनिटांच्या सुमरास इंदापूर शहरातील खुळे चौकात असणाऱ्या ज्योती स्टील सेंटर या दुकानासमोर दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये इंदापूर शहरातील तौफिक हारून सय्यद या 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर सज्जाद युनूस शेख (वय 25वर्ष, रा. कसबा पेठ, इंदापूर) गंभीर जखमी झाला. समोरून धडक देणाऱ्या दुचाकीवरील दोघा युवकांना देखील गंभीर इजा झाली असून, जखमींना उपचारार्थ अकलूजच्या खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार तौफिक हारून सय्यद आणि त्याचा मित्र सज्जाद युनूस शेख हे दोघे आपल्या दुचाकीवरून खुळे चौकाच्या दिशेने डाव्या बाजूने चालले होते. दरम्यान ज्योति स्टील सेंटर समोर आले असता विरुद्ध दिशेने (राॅंग साईडने) आलेल्या यामाहा आर वन (एमएच 42 बीजी 0358) या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार यामाहा आर वन गाडीवरील दोघे युवक अकलूजच्या दिशेने निघालेल्या डस्टर या चारचाकीला अतिशय वेगाने ओव्हरटेक करत होते. ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांनी चुकीच्या दिशेने जात डाव्या बाजूने निघालेल्या तौफिक सय्यद यांच्या गाडीला समोरून जोरदार धडक दिली. रक्तबंबाळ अवस्थेत तौफिकला अकलूजच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर सज्जाद यालाही बिचकुले रुग्णालयातून प्राथमिक उपचारानंतर अकलूजच्या इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचे इंजिन अक्षरशः ध्वस्त झाले. धडके नंतर वेगात असलेली आर वन दुचाकी धडकेनंतरही जवळपास 50मिटर अंतरापर्यंत फरफटत गेली. या अपघातात मयत झालेला तौफिक हा ड्रायव्हिंग करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तो अतिशय गरीब कुटुंबातील असून, अतिशय शांत आणि मनमिळावू स्वभावासाठी तो ओळखला जात होता. धडक देणारे दोघे युवकांचा पत्ता समजू शकला नाही.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी