गुंडेगाव सोसायटीत भैरवनाथ शेतकरी पॅनेल विजयी, बाळासाहेब हराळ गटाचे वर्चस्व

By : Polticalface Team ,Mon May 16 2022 11:37:20 GMT+0530 (India Standard Time)

गुंडेगाव सोसायटीत भैरवनाथ  शेतकरी पॅनेल विजयी, बाळासाहेब हराळ गटाचे  वर्चस्व गुंडेगाव : नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था एक चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी चे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शेतकरी पॅनलने रामेश्वर शेतकरी विकास पॅनलवर १३-०ने मात करुन आपले वर्चस्व यावेळीसुद्धा अबाधित ठेवण्यात यश मिळविले. गुंडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १३ कार्यकारी मंडळाची निवड करण्यासाठी दि.१५ रोजी निवडणुक घेण्यात आली. गावपाळीवरील सहकार क्षेत्रातील संस्थेच्या निवडणुकीत बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ शेतकरी पॅनल तर गुंडेगावाचे विद्यमान उपसंरपच संतोष भापकर, प्रा रंगनाथ भापकर, मंगेश हराळ यांच्या नेतृत्वाखाली रामेश्वर शेतकरी विकास पॅनल सर्वशक्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते. दोन्ही पॅनलने सदर निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गावच्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत गावातीलअनेक दिग्गज अनेक प्रर्वग गटामधून उमेदवारी असल्याने निवडणुकीकडे गावासह परिसरातील राजकारण्यांचे लक्ष केंद्रित झाले होते. संस्थेच्या मतदारांना आपल्या बाजुने करण्यासाठी दोन्ही पॅनलच्यावतीने कोणतीही कसर ठेवल्या गेली नाही. मतदानाच्या दिवसापर्यंत गावात राजकीय वातावरण तापले दिसत होते. मागील पाच वर्षात संस्थेच्या प्रगतीची जाण ठेवून मतदारांनी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ ,माजी संरपच संजय कोतकर, सुनील भापकर यांच्या गळ्यामध्ये विजयपथाची माळ टाकली. त्यांच्या भैरवनाथ शेतकरी विकास पॅनेलचे सचिन कुताळ, कोतकर भाऊसाहेब, जाधव वामन, धावडे आंबादास, निकम चंदु, भापकर पंडीत, हराळ धन्यकुमार, हराळ शंकर, पवार अशोक, कोतकर मंगल, भापकर छाया, कोतकर रावसाहेब, बैरागी गोपाळराव विजयी झाले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी