By : Polticalface Team ,Wed May 18 2022 11:47:51 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
सविस्तर वृत्त असे की दिनांक 17 मे रोजी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी चौफुला येथील संजय शेळके मेजेर यांच्या मालकीचा इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंपावरील मॅनेजर अमोल ढोले हे दोन ते तिन दिवसा ची पेट्रोल पंपावरील 12 लाख रुपये रोख रक्कम देवदैठण येथील सेंट्रल बँकेमध्ये भरणा करण्याठी दुपारी 3 च्या दरम्याण दुचाकीवरून चालला असाता ढवळगाव च्या पिराच्या वळणावर मोरया हॉटेलच्या समोर काळ्या रंगाच्या बिगर नंबर प्लेट युनिकॉर्न दुचाकीवरून काळया रंगाचा शर्ट व पांढरा रंगाचा शर्ट व तोंड पूर्णपणे झाकलेले दोन व्यक्तीने गाडीला ओव्हरटेक करत मॅनेजरच्या डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकली व मॅनेजरने आरडाओरड केली असता त्याच्या वर पिस्तुल रोखून त्याच्या जवळील पैशाची बॅग हिसकवून घेऊन शिरुरच्या दिशेणे पसार झाले अशी माहीती समजली आसुन,
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर अनील कटके साहेब,कर्जत ऊप विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव,बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, हे घटनास्थळी पोहचून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पुढील तपास करत आहे.
वाचक क्रमांक :