श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याची बॅकचे कर्ज, खाजगी सावकाराचे कर्ज,पतसंस्थेचे कर्ज या कर्जदारांना कंटाळून आत्महत्या
By : Polticalface Team ,Wed May 18 2022 11:53:39 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :- श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील शेतकरी संभाजी विश्वनाथ बारगुजे यांनी बॅकचे कर्ज, खाजगी सावकाराचे कर्ज,पतसंस्थेचे कर्ज या कर्जदारांना कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन स्वतःची जिवन यात्रा संपवली. श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील शेतकरी संभाजी विश्वनाथ बारगुजे वय-39 वर्षे हा युवक शेती व्यवसाय करून कुटुंब चालवत होता. आई व वडील भाऊ- भावजई पत्नी, असे एकत्रित कुटुंब असून तो कुटुंबातील प्रमुख होता. शेती विकसित करण्यासाठी एचडीएफसी बँक यांचेकडून वडिलांच्या नावाने. ७ लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याचे व्याजासकट सुमारे २१ लाख रुपये झाले. तसेच एका पतसंस्थेकडून दीड ते दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याच प्रमाणे एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खाजगी सरकाराकडून २ लाख रुपये दहा रुपये टक्के व्याजाने घेतले असल्याने मयत संभाजी यास खाजगी सावकार घरी जाऊन वारंवार चार लोकांमध्ये मारहाण करण्याची धमकी देत असे. तसेच बॅंका आणि पतसंस्था यांच्याही वारंवार जप्तीच्या नोटिसा येत होत्या. त्यामुळे या त्रासाला कंटाळून राहत्या घरी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. झोपेतून पत्नी जागी होताच पती घरात नसल्याचे समजताच पाहून ते बाहेर येताच त्यांना त्याच्या पडवीमध्ये संभाजी याचे फाशी घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने तिने आरडा ओरडा करून सर्वांना जागे करून बेलवंडी पोलीस स्टेशनला खबर दिली. मयत संभाजी याच्या पाच्छात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी, आई - वडील, भाऊ -भावजई असा परिवार आहे.
वाचक क्रमांक :