शिवम प्राईड या हॉटेल चे उद्घाटन नुकतेच माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न
By : Polticalface Team ,Thu May 19 2022 07:17:54 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा प्रतिनिधि शेलगाव वांगी येथील शिवम प्राईड या हॉटेल चे उद्घाटन नुकतेच माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले
मौजे शेलगाव वांगी येथे शिवम प्राइड भव्य असे हॉटेल घोगरे बंधूंनी उभारले आहे घोगरे बंधूनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सदरचे हॉटेल उभा केले आहे सदर हॉटेल चे उद्घाटन राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले सदर चा उद्घाटन सोहळा दिनांक 16/05/2022 रोजी संपन्न झाला यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा.श्री. आप्पासाहेब जगदाळे इंदापूर, माजी आमदार नारायण आबा पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव मा.विलासराव घुमरे सर मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री दिग्विजय बागल, पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दराडे गुरुजी या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला यावेळी माननीय नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी घोगरे बंधू नी उभा केलेल्या भव्य अशा हॉटेलचे कौतुक केले व आप्पासाहेब जगदाळे घुमरे सर व दिग्विजय बागल यांचेही भाषण झाले व्यवसायामध्ये घोगरे बंधूंनी केलेली प्रगती याचे सर्वांनी कौतुक केले व उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ दे अशा पद्धतीचे शुभेच्छा दिली व वेळोवेळी आम्ही आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशी ग्वाही दिली यावेळी शेलगाव सह परिसरातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती
सदर हॉटेल चा उद्घाटन सोहळा शांततेत पार पाडण्याकामी प्रवीण उर्फ आबा आनंदराव घोगरे, तसेच संतोष उर्फ काका आनंदराव घोगरे, शिवम उर्फ आबा अरविंद घोगरे, शिवराज उर्फ भैय्या अरविंद घोगरे यांनी विशेष परिश्रम घेतले
वाचक क्रमांक :