बळजबरीने दारू पाजून तरूणी सोबत केले दुष्कृत्य पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,Fri May 20 2022 21:36:17 GMT+0530 (India Standard Time)

बळजबरीने दारू पाजून तरूणी सोबत केले दुष्कृत्य पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल श्रीगोंदा: तालुक्यात गावात एका तरुणीला मोटार सायकलवर घेऊन जाऊन, दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री 1:45 वाजण्याच्या सुमारास एरंडोली गावचे शिवारात देवी मंदिराचे पाठीमागे जंगलाचे कडेला उघड्यावर आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बियर पाजुन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने बेलवंडी पोलीस स्टेशनला काल दिनांक 19 मे 2022 मे रोजी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे. तरुणी लहानपणापासून आपल्या आजी सोबत तालुक्यातील एका गावात राहत आहे. मागील 2 वर्षापासून तरुणी आरोपीला ओळखत आहे. दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 4:00 वाजता आरोपीने तरुणीला फोन करून गावाच्या बाजूला असलेल्या मज्जिद जवळ बोलावले.. घरच्यांना न सांगता तरुणी नमूद ठिकाणी गेली... तेथून मोटरसायकलवर दोघे चिखली घाटातील महादेव मंदिराजवळ डोंगरावर गेले... मंदिराच्या बाजूला झाडाच्या आडोशाला जाऊन गाडीच्या डिक्कीतून आणलेली बीअरची बाटली जबरदस्तीने पीडितेला त्याने पाजली. गोड गोड गप्पा मारून तुझ्या सोबत लग्न करतो म्हणत लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने त्या मध्यरात्री तरुणीसोबत दुष्कृत्य केले. यानंतर तिला गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला 2:00 वाजताच्या सुमारास एकटीला सोडून दिले व परत येतो म्हणाला. साधारण दीड तास तिने त्याची वाट पाहिली. मात्र, तो परत आला नाही. पहाटे 4:00 वाजण्याच्या सुमारास गावाकडे जाणारा एक टेम्पो थांबला व त्याने विचारपूस करून नमूद पीडितेला तिच्या गावात आजीकडे पोचवले. दुपारी आजी व आई यांना नमूद घटनेबाबत तिने सांगितल्यावर आजी, आईला मानसिक धक्का बसल्याने पीडित तरुणीने फिर्याद दाखल करण्यास विलंब केल्याचे नमूद केले आहे. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने नमूद आरोपी विरोधात भादवि कलम 376 व अनुसूचित जाती जमाती कायदा कलम 3(1)(A) व 3(2)(VA) प्रमाणे दिनांक 19 मे 2022 रोजी रात्री 10:58 वाजता पीडित 20 वर्षीय तरुणीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्रोत:(फिर्याद)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष