श्रीगोंदा मतदार संघातील रस्त्यांसाठी 9 कोटी 20 लक्ष रुपये निधी मंजूर.  काम निकृष्ट झाले तर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकू-- आमदार बबनराव पाचपुते 
                      
                
            
               By : Polticalface Team ,Fri May 20 2022 22:09:32 GMT+0530 (India Standard Time)
       
               
                           
              श्रीगोंदा - श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील खराब रस्त्यांच्या बांधणीसाठी 30 54 आणि 50 54 या हेड अंतर्गत सन 2020 21 व 2021 22  या दोन वर्षासाठी रुपये 9 कोटी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आली असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. 
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की , " तालुक्यातील काही रस्त्यांचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे तर काही रस्त्यांचे काम पूर्णत्वाकडे आहे. महाराष्ट्र मध्ये कोरोना काळात बरीच कामे रखडली होती परंतु आता सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असल्यामुळे रस्ते कामास गती आलेली आहे. कामाचा दर्जा कुठे खराब असेल तर त्याबाबत संबंधित अधिकारी किंवा माझ्याशी संपर्क करण्याबाबतही ग्रामस्थांना व नागरिकांना सूचना करण्यात आलेले आहे. कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड होणार नाही.  ठेकेदारामार्फत निकृष्ट दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठेकेदाराला शासकीय यंत्रणेमार्फत काळ्या यादी मध्ये टाकण्याचे काम केले जाईल."
जिल्हा वार्षिक योजना 50 54 अंतर्गत 2021 22 मधील श्रीगोंदा* तालुक्यातील मौजे कोंडेगव्हाण ते पिंपरी कोलंदर चौफुला रस्ता मजबुतीकरण करणे 50 लक्ष रुपये, मौजे देवदैठण ते पाडळी रस्ता  करणे 30 लक्ष रुपये, मौजे चिंभळा ते साळवे वस्ती- लोणी व्यंकनाथ रस्ता करणे 50 लक्ष रुपये, म्हसे फाटा ते वडगाव शिंदोडी चिंचणी धरण तालुका आधी पर्यंत रस्ता करणे 45 लक्ष रुपये, लोणी रेल्वे गेट ते बेलवंडी स्टेशन महादेववाडी रस्ता करणे 25 लक्ष रुपये,  मुंगूसगाव ते सुरेगाव रस्ता करणे 20 लक्ष रुपये *नगर तालुक्यातील सन 2021 -22* अंतर्गत 3054 योजनेत घेण्यात आलेली कामे पुढील प्रमाणे टाकळी काझी ते जळगाव रस्ता करण्यात 30 लक्ष रुपये,  हातवळण ते मांडवगण फाटा रस्ता करणे 25 लक्ष  रुपये संजीवन गड ते सोनवाडी रस्ता करणे तालुका नगर 45 लक्ष रुपये तसेच *जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सन 2019 22* साठी  ढवळगाव येवती रस्ता मजबुतीकरण करणे 25 लक्ष रुपये राज्य, मार्ग 55 जंगलेवाडी रस्ता मजबुतीकरण करणे 40 लक्ष रुपये, पिंपरी कोलंदर ते रायगव्हाण रस्ता मजबुतीकरण करणे 40 लक्ष रुपये, पिंपळगाव पिसा सरोदे मळा रस्ता करणे 20 लक्ष रुपये, पेडगाव ते झिटे वस्ती रस्ता करणे 20 लक्ष रुपये, माठ ते नहारवाडा रस्ता करणे 45 लक्ष रुपये, मढेवडगाव ते शिंदे मळा रस्ता 20 लक्ष रुपये, लिंपणगाव शेंडेवाडी रस्ता करणे 14 लक्ष रुपये, हिंगणी ते सावंतवाडी रस्ता करणे 25 लक्ष रुपये, MDR ६३ ते घुगलवडगाव रस्ता 20 लक्ष रुपये, देऊळगाव गलांडे ते टाकळी लोणार रस्ता 20 लक्ष रुपये, हिंगणी ते दाणेवाडी  गोपाळवाडी रस्ता करण्यासाठी 25 लक्ष रुपये, चिखली ते साकळाई रस्ता करण्यासाठी 20लक्ष रुपये, बेलवंडी कोठार असता करण्यासाठी 20 लक्ष रुपये,  ढोरजा घारगाव रस्ता करण्यासाठी 30 लक्ष रुपये, उखलगाव रोड ते 55 रस्ता करणे 25 लक्ष रुपये, श्रीगोंदा ते बाबुर्डी रस्ता करणे 20 लक्ष रुपये, थिटे सांगवी ते देवकाते वस्ती रस्ता 20 लक्ष रुपये, काष्टी ते गवतेवस्ती रस्ता 20 लक्ष रुपये, काकडे वस्ती ते पेडगाव रस्ता 10 लक्ष रुपये, आढळगाव ते कोकणगाव रस्ता 10 लक्ष रुपये, घिघेवस्ती ते धर्मनाथ मंदिर, तांदळी वडगाव तालुका नगर रस्ते करणे 10 लक्ष रुपये, बारादरी रस्ता करणे 25 लक्ष रुपये, लोणी व्यंकनाथ वेताळवस्ती रस्ता करणे 20 लक्ष रुपये. 
विकास कामांवर परिणाम होणार नाही.. 
तालुक्यात सध्या कोण एकत्र येणार अन कोण स्वतंत्र लढणार यावर खळ चालू आहे. तालुक्याच्या विकास कामांच्या बाबती आपण कटिबद्ध व नियोजनबद्ध काम करत आहोत. कोव्हिड चा अपवाद वगळला तर तालुक्यातील विकास कामांवर कसलाही परिणाम झाला नाही. सामान्यांशी असलेली नाळ ही गेल्या ४० वर्षांपासून अखंड आहे. माझ्या लोकांवर व तालुक्यातील सुजाण नागरिकांवर तालुक्यातील राजकीय चर्चेचा कोणताही परिणाम होणार नाही.  - बबनराव पाचपुते (आमदार श्रीगोंदा)
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष