श्रीगोंद्यात चला हवा येऊ द्या या आयोजित राजेंद्र दादा नागवडे मित्रपरिवारातचे तालुक्यातील जनतेकडून उदंंड प्रतिसाद
By : Polticalface Team ,Sun May 22 2022 17:58:49 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेते व सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त काल छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमास जमलेल्या गर्दीने आज पर्यंतचे सारे उच्चांक मोडीत काढले. या कार्यक्रमाला तालुक्यातील कानाकोपऱ्यातील जनतेने उदंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. त्यामुळे तालुक्यात राजेंद्र दादा नागवडे यांच्या अनुराधाताई नागवडे यांच्या हवेची जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान अनुराज फाउंडेशन आदेश नागवडे ग्रुपने त्याबरोबरच राजेंद्र दादा मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलावंत भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे या कलाकारांनी तुफान हास्याचे फवारे उडवले. श्रुती मराठे व इतर कलाकारांच्या विनोदाच्या कॉमेडीने प्रेक्षक मंत्र मुक्त झाली. सूत्रसंचालन माया पळसकर व प्रसाद यांनी केले. तर व्यवस्थापन व नियोजन थिंक ब्रँडेड अवधूत राऊत यांनी पाहिले .
पाचपुते गटाची सुप्त तयारी चालू असताना तिकडे माजी आमदार राहुल जगताप यांनी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून विधानसभेच्या तयारीला लागल्याचे संकेत दिले आहेत. राजेंद्र दादा नागवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या आयोजनाने विधानसभेला तालुक्यात हवा कुणाची या चर्चेला उधाण आले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गीय सहकार महर्षी शिवाजीराव बापू नागवडे यांचे दोन मिनिटे स्मरण करण्यात आले. त्यानंतर स्वागत अध्यक्षा जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे यांनी सर्व प्रेक्षकांचे जाहीर स्वागत केले .तर जागेची कुचंबना झाल्यामुळे दिलगिरीही व्यक्त केली. या कार्यक्रमास पक्षीय राजकारणाच्या पलीकडेची जनतेचे प्रेम व स्नेह जपत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ,पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी राजेंद्र दादा नागवडे व सौ अनुराधा ताई नागवडे वहिनी यांनी कौटुंबिक व राजकीय प्रश्नांना समर्पक शैलीतपणे उत्तरे दिली. राजेंद्र दादांना विचारले असता कारखान्यात गुंतून राहणार की? विधानसभा लढवणार? त्यावर दादांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढून जिंकणारच असे ठामपणे सांगितले. या प्रश्नावर उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. राज्याच्या नेतृत्वायाविषयी विचारले असता फडणवीस की? अजितदादा त्यावर दादांनी राज्याचे नेतृत्व अजितदादांनी करावे असे सुचवले. विधानसभेला कोणास प्रतिस्पर्धी असेल या उत्सुकतेच्या प्रश्नावर उत्तर देताना दादा म्हणाले की विधानसभेच्या निवडणुकीत विजयी उमेदवार या अनुराधा नागवडे असतील असे ठणकावून सांगितले. काही कौटुंबिक प्रश्नांना दादा वहिनी मोठ्या खुबीने उत्तरे दिली. काही का असेना परंतु श्रीगोंद्याच्या हवेत सध्या बदल झाल्याचे जाणवत आहे. असे उपस्थित प्रेक्षकांमधूान दिसून आले. हवेने काहींना ॲलर्जी, काहींना डोकेदुखी, काही न जळजळ तर काहींची झोपच उडाली आहे. या कार्यक्रमात राजेंद्र दादा नागवडे व सौ अनुराधाताई नागवडे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांची कन्या अंकिता पाटील सर्व कलाकार आयोजक व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून त्यांचा सन्मान करण्यात आला. निश्चितच श्रीगोंद्यात चला हवा येऊ द्या या राजेंद्र दादा मित्रपरिवार टीमच्या श्रीगोंदा दौर्याने तालुक्यातील जनतेचे मनासुरात मनोरंजन तर झालेच आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची नांदी देखील या कार्यक्रमाच्या रूपाने जनतेच्या साक्षीने चित्र स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी