नवनाथ आरोळे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड

By : Polticalface Team ,Mon May 23 2022 08:54:23 GMT+0530 (India Standard Time)

नवनाथ आरोळे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी युवा कार्यकर्ते नवनाथ आरोळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच बाळासाहेब अकोलकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेत आरोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. करंजी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १३ आहे. तत्कालीन उपसरपंच दयाबाई क्षेत्रे यांचे दुःखद निधन झाल्याने उपसरपंच पद रिक्त होते. या पदासाठी नवनाथ आरोळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंचपदी निवड झाल्याची घोषणा शासकीय निवडणूक अधिकारी ग्रामसेवक रवींद्र देशमुख यांनी केली. आरोळे यांनी घरकुल, मोफत गॅस, श्रावणबाळ योजना अशा अनेक शासकीय योजना सर्वसामान्य ग्रामस्थापर्यंत पोहोचविल्या आहेत. त्यामुळे सर्व कामाची पावती म्हणून उपसरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व तरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ यांनी एकच जल्लोष केला. गावातील प्रलंबित कामे, गावातील रस्ते, पाणी योजना, स्वच्छता ही कामे अग्रक्रमाने हाती घेऊन स्वच्छ करंजी व सुंदर करंजी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस नवनाथ आरोळे यांनी बोलून दाखविला. यावेळी लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब आकोलकर, ज्येष्ठ नेते विजयराव आकोलकर, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी सरपंच शिवाजी भाकरे, ग्रा.पं. सदस्य रोहित अकोलकर, राहुल अकोलकर, बाबा गाडेकर, धोंडीभाऊ हजारे, अमोल आगाशे, युवा उद्योजक रविंद्र सादरे, शेखर मोरे, विकास अकोलकर, युवानेते विवेक मोरे, मतीन मनियार, विश्वास क्षेत्रे, धर्मा क्षेत्रे, सुधीर आरोळे, अजित ओहोळ, प्रा. प्रशांत ठाकरे, सर्व ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित उपसरपंच आरोळे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
(१)- सर्व ग्रामस्थ, नेते यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला. त्याला मी तडा जाऊ देणार नाही. मी अनेक कामे मार्गी लावले आहेत व यापुढे देखील गावासाठी पूर्ण वेळ देऊन विकास कामांना प्राधान्य दिले जाईल. -नवनिर्वाचित उपसरपंच नवनाथ आरोळे
(२)- नवनाथ आरोळे सारख्या अतिशय सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील, एकनिष्ठ तसेच कर्तव्यदक्ष तरुणाला उपसरपंच पद देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला. -युवानेते, मार्गदर्शक विजयराव आकोलकर

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी