श्रीगोंदा तालुक्यातील सौ नलगे जगताप, श्री.अनपट, श्री लगड, सौ दरेकर, श्री शेलार आदींना एक्सलंट टीचर लोकमत अॅवॉर्ड २०२१-२२ या पुरस्काराने सन्मानित
By : Polticalface Team ,Mon May 23 2022 20:37:01 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव( प्रतिनिधी) सौ वनिता नलगे जगताप श्री बी के लगड सौ अलका दरेकर श्री एन टी शेलार आदींना एक्सलंट टीचर लोकमत अवार्ड २०२१-२२ चा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार राज्याचे मंत्री ना शंकराव गडाख, ना बच्चुभाऊ कडू या राज्यमंत्र्यांच्या हस्ते व शिक्षण उपसंचालक श्री दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी अशोकराव कडूस, यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सौ वनिता नलगे जगताप या बाबासाहेब जगताप राज्य सरचिटणीस प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या पत्नी तर आप्पासाहेब जगताप जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संघटना अहमदनगर यांच्या भाऊजयी आहेत. पुरस्कार प्राप्त सौ नलगे यांनी काही काळ कर्जत येथे प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे काम केले. त्यानंतर त्यांची बदली होऊन त्या श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत आपल्या सेवेत बावीस वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र काम पार पाडत आहेत.
या पुरस्कार प्राप्त सौ वनिता नलगे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांसाठी अनेक शालेय उपक्रम राबवले. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी करून योग्य असे मार्गदर्शन केले. त्यामुळे अनेक विद्यार्थी जिल्हा व राज्य पातळीवर चमकले. ज्ञानदानाचे काम करत असताना होतकरू गोरगरीब तसेच आदिवासी मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रोत्साहित केले. ज्ञानदान करत असताना विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानदानातून संस्काराचे धडे देत प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम केले. त्यांना यापूर्वी सन २००८-०९ रोजी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला, तर जिल्हा शिक्षक बँकेतर्फे देखील सौ नलगे जगताप यांना सन्मानित करण्यात आले होते. तर ग्रामगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला होता. आता त्यांना पुन्हा एक्सलंट टीचर लोकमत अवार्ड पुरस्कार प्राप्त झाला आहे.
श्री बाळासाहेब हरिश्चंद्र अनपट मुख्याध्यापक जि प प्राथ शाळा अजनुज यांनानामदार श्री बच्चू कडू शालेय शिक्षण राज्य मंत्री महाराष्ट्र व मा. नामदार श्री शंकरराव गडाख साहेब जल संधारण मंत्री महाराष्ट्रराज्य याचे हस्ते प्रदान करण्याचा आला.
सदरचा एक्सलंट टीचर लोकमत अवार्ड 20 21- 22 पुरस्कार सहकारमहर्षी नागवडे शिवाजीराव नारायणराव नागवडे विद्यालयाचे माजी प्राचार्य बी के लगड, डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ अलका दरेकर, जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री एन टी शेलार यांना देखील एक्सलंट टीचर अवॉर्ड पुरस्कार प्राप्त झाला आहे. यापूर्वी या वरील तीनही गुरुवर्य यांना देखील शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पुरस्कार प्राप्त गुणवंत गुरुवर्य यांचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ अनुराधाताई नागवडे, वांगदरी गावचे सरपंच आदेश शेठ नागवडे आदींसह शिक्षक प्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.