नगरपरिषदेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रद्धांजली ; बिंदुसरा नदीपात्र मान्सूनपूर्व स्वच्छ व अतिक्रमित बांधकाम प्रकरणात दोषींवर कारवाईस असमर्थ:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
By : Polticalface Team ,Mon May 23 2022 23:28:18 GMT+0530 (India Standard Time)
बीड नगरपरिषद बीड शहरातील नदी, नाले, ओढे यांच्यावरील अतिक्रमित बांधकाम प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास तसेच बिंदुसरा नदीपात्र मान्सूनपूर्व स्वच्छ करण्यास असमर्थ मृतप्राय नगरपरिषद प्रशासनाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखालील आज दि.२३ मे सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निष्क्रिय मृतप्राय नगरपरिषद प्रशासनाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, शोकसभेला व श्रद्धांजली वाहण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड,माजी सैनिक अशोक येडे ,जिल्हाध्यक्ष आप बीड,भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, बलभीम उबाळे,उपाध्यक्ष मराठवाडा,ऑल इंडिया पॅथर सेना नितिन सोनावणे,सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद,शेख मुबीन बीडकर ,सरफराज खान,ज्ञानेश्वर शिंदे, राज्य उपाध्यक्ष मनसे अशोक तावरे आदि सहभागी होते. निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर माहीतीस्तव:-
___
बीड शहरातील बिंदुसरा, करपरा तसेच मौजे. आनंदवाडी येथील सर्व्हे नंबर २०२ सरवळा नामक ओढा तसेच करपरा नदीला लागुन भक्ति कन्स्ट्रक्शन नगरच्या पाठीमागील बाजुस तसेच बिंदुसरा नदीपात्रात सारडा कॅपिटलच्या पाठीमागील बाजुस अनाधिकृत बांधकाम करण्यात येत असून संबधित प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्यात नगरपरिषद प्रशासन असमर्थ असून मुख्याधिकारी नगरपरिषद बीड, नगररचनाकार, भुमिअभिलेख, जलसंपदा विभागातील आधिका-यांसह भुमाफियांनी संगनमतानेच जागा हडप केल्या असून संबधित प्रकरणात पुराव्यासह तक्रारी,आंदोलनानंतर सुद्धा जाणीवपूर्वक कारवाईस टाळाटाळ केली जात आहे.
मान्सूनपूर्व स्वच्छतेचा निधी घशात ; दुषित पाणी नागरीकांच्या घरात ; नागरीकांचे रोगराई पासुन रक्षण करा:-डाॅ.गणेश ढवळे
___
मान्सूनपूर्व स्वच्छतेसाठीचा निधी राजकीय नेत्यांच्या घशात आणि बिंदुसरा नदीपात्रातील तसेच ओढ्यातील पाणी नागरीकांच्या घरात अशी अवस्था दरवर्षीप्रमाणेच झाली असून पावसाळ्यात नदीचे पाणी वस्त्यामध्ये शिरत असून रोगराई पसरण्याचा धोका असून तो टाळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामांना प्राधान्य देऊन नदीपात्रातील कचरा, झाडे, झुडपे काढुन टाकावीत,तसेच पर्यावरणाचा -हास करत पर्यावरण प्रदुषित केल्याबद्दल संबधित दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मागणी केली आहे.
घनकचरा व्यवस्थापनाचे वर्षाकाठी साडेतीन कोटी पाण्यात;कंत्राटदार कनक एन्ट्रप्रायजेसवर कारवाई करा
___
बीड शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट अमरावतीच्या कनक एन्ट्रप्रायजेस कंपनीला देण्यात आले असुन महिन्याकाठी २७ लाख रूपये म्हणजेच वर्षाकाठी साडेतीन कोटी रूपये दिले जातात.मात्र नियमित घंटा गाडी, कचरा उचलणे, गल्लोगल्ली कचरा संकलन करणे आदि. कोणतीही कामे न करताच कचरा बिंदुसरा नदीपात्रात टाकुन पाणी दुषित करून रोगराई पसरवण्यास कारणीभूत ठरत आहेत.कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
भविष्यात पुरामुळे जिवितहानी झाल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
____
१९८९ साली बीड शहरातुन जाणा-या बिंदुसरा नदीचे पाणी शहरातील अनेक वस्तीमध्ये घुसुन मोठ्याप्रमाणात आर्थिक व जिवितहानी झाली होती भविष्यात तशी दुर्घटना घडल्यास संबधित जबाबदार नगरपरिषद बीड, नगररचनाकार, भुमिअभिलेख, जलसंपदा विभागातील आधिका-यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल करण्यात यावेत.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.