डॉ.बाबु जोगदंड यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार जाहीर मुबंई याठिकाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित होणार

By : Polticalface Team ,Wed May 25 2022 16:44:21 GMT+0530 (India Standard Time)

डॉ.बाबु जोगदंड यांना राज्यस्तरीय  समाजरत्न पुरस्कार जाहीर मुबंई याठिकाणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित होणार (बीड प्रतिनिधी) दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल मध्ये होणार असून वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाजभूषण आणि विविध माध्यमांतील पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. बीड जिल्हयातील गोरगरिबांना सतत मदत करणारे सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व चौसाळा कृमभुमी असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबु जोगदंड साहेब यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून त्याना समाजरत्न पुरस्काराने गोरविण्यात येणार आहे. डॉक्टर बाबु जोगदंड यांनी अंध अपंग निराधार वृद्धांना सतत मायेचा हात देऊन आर्थिक मदत केली आहे व करत आहेत तसेच कोरोना काळात वाडी वस्ती तांड्यावर जाऊन गोरगरिबांना एक महिना पुरेल एवढे राशन किराणा चे वाटप त्यांनी कोरोना काळामध्ये केले होते चौसाळा जिल्हा परिषद सर्कल मध्ये राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रीय असा त्यांचा नेहमीच सहभाग असतो बीड चे लाडके आमदार माननीय संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर केलेले आहे प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीला सामाजिक उपक्रम राबवून वृक्षलागवड करणे , अन्नधान्य पुरवठा करणे, गोरगरिबांना अनाथांना राशन वाटप करणे त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातील प्रश्न सोडवणे अशा पद्धतीचे विविध उपक्रम डॉक्टर बाबु जोगदंड यांच्यामार्फत नेहमीच राबवले जातात. डॉक्टर बाबु जोगदंड यांनी गोरगरिबांसाठी शासकीय हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया, आरोग्य शिबिर, औषध वाटप अशा पद्धतीची शिबिर सुद्धा आयोजन केलेली आहेत. या सर्व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन दैनिक लोकांकित परिवारातर्फे त्यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, अलिबाग विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी, बाळासाहेब पाटील ( महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष, भाजप), संदीप भैया क्षिरसागर - आमदार बीड विधानसभा सभा मतदार संघ , जयवंत सुतार, महापौर नवी मुंबई मनपा, जे एम म्हात्रे मा. नगराध्यक्ष, पनवेल, जेष्ठ समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला, सामाजिक कार्यकर्ते तथा दैनिक लोकांकितचे बीड जिल्हा प्रतिनिधी विवेक कुचेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील सिने, नाट्य कलावंत उपस्थित राहणार असून यावेळी मनोरंजनासाठी लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक २९/५/२०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता पनवेल येथे होणार आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी