श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे कॅम्पस प्लेसमेंटद्वारे आठ विद्यार्थ्यांची झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये निवड

By : Polticalface Team ,Thu May 26 2022 10:42:52 GMT+0530 (India Standard Time)

श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी येथे  कॅम्पस प्लेसमेंटद्वारे आठ विद्यार्थ्यांची झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये निवड आष्टी प्रतिनिधी आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संचालित ,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सलग्न,श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी ,येथे दिनांक २५/०५/२०२२ रोजी कृषी महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल द्वारे झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीत अग्रिकल्चर फिल्ड ऑफीसर पदाकरीता मुलाखती घेण्यात आल्या. कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यू करिता महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षांत शिक्षण घेत असणाऱ्या २८ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. उमेदवार निवड प्रक्रिया वेगवेगळ्या तीन टप्प्यात घेण्यात आली. प्रथम नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. यानंतर नोंदणीकृत उमेदवारांचे ग्रुप डिस्कशन आयोजन करण्यात आले होते. सरतेशेवटी सर्व उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आल्या. सर्व परीक्षांच्या सरासरी मूल्यांकन करून महाविद्यालयातील आठ विद्यार्थ्यांची अंतिम निवड अग्रिकल्चर फील्डऑफिसर या पदासाठी करण्यात आली. निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे, लटके सागर विष्णू, पाटील विशाल दादासाहेब, गाजरे विनायक भगवान, लटके निखिल रामराज, मुळीक संग्राम हणमंत, इंदलकर प्रदुमन बाळासाहेब,निर्मळ शुभम शिवाजी व नेटके शुभम काशिनाथ.निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. श्री. भीमराव आनंदराव धोंडे, सह सचिव डॉ.अजय भीमराव धोंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ.राऊत डी.बी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आरसुळ एस. आर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या उपक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी प्लेसमेट विभाग प्रमुख इंजी. जाधव प्रविण नामदेव, उपविभागप्रमुख प्रा.साबळे महेश विक्रम, प्रा. सुजाता लक्ष्मण बनकर, डॉ.अजबे एम.ए, प्रा.तांबोळी आय. एम, प्रा.गुंजाळ बी.आर, प्रा. काळे पी.आर, श्री. क्षेत्रे डी.पी यांनी परिश्रम घेतले. या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी झायडेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये एरिया सेल्स मॅनेजर या पदावर काम करणारे श्री. संदीप माळी, श्री. महेंद्र बरबडे व श्री. राहुल शेडगे यांचा समावेश होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केल्याबद्दल प्राचार्य यांनी निवड समितीतील सर्व सदस्यांचे आभार मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी