करमाळा येथे तीन दिवसाचे मोफत फिटनेस शिबीर...महेश वैद्य

By : Polticalface Team ,Thu May 26 2022 17:03:49 GMT+0530 (India Standard Time)

करमाळा येथे तीन दिवसाचे मोफत फिटनेस शिबीर...महेश वैद्य करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विक्रमवीर महेश वैद्य करमाळा येथे हॅपी माईंड हॅपी हेल्थचे धडे देणार आहे या उपक्रमास यशकल्याणी संस्थेचे प्रा. गणेश भाऊ करे पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे , डॉ. बाबूराव हिरडे किसन कांबळे तालुकाध्यक्ष मागासवर्गीय शिक्षक संघटना हे उपस्थीत राहणार आहेत. करमाळा येथील रहिवासी असलेले परंतु सध्या मुंबई येथे फिटनेस अकॅडमी चालवणारे विक्रमवीर महेश वैद्य करमाळा येथील किल्ला वेशीमधील नगरपालिकेच्या जयवंतराव जगताप सभागृहात दिनांक २७ मे पासून २९ मे पर्यंत हॅपी माईंड हॅपी हेल्थचे धडे देणार असल्याची माहिती महेश वैद्य यांनी दिली आहे. यामध्ये सकाळी ६ ते ९या वेळेत पुरुषांसाठीआणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत महिलांसाठी शिबीर संपन्न होणार आहे. करमाळा ही माझी मायभूमी आहे या मातीशी व इथल्या माणसांशी माझे प्रेमाचे नाते जोडलेले आहे याची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे. मागील पंचवीस वर्षे मुंबई येथे फिटनेस अक्याडमी अविरत चालू आहे, सिने विश्वातील व उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती आज या फिटनेस अक्याडमी मध्ये आनंदी जीवनासाठी व आरोग्यासाठी कार्यरत आहेत. कोरोना महामारीने सर्व जगभर थैमान घातले आहे माणूस पूरता हादरून गेला आहे त्यामुळे लोकांना आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज वाटत आहे. रोज आरोग्यासाठी पंचेचाळीस मिनिटे देणे ही गरज निर्माण झाली आहे.माणसाची रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी या कल्पनेचा निश्चितच फायदा होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा. व्यायाम हा प्रकार सर्वांना माहीत आहे तो कसा करावा किती करावा याची सांगड घालणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य व्यायाम व समतोल आहार गरजेचा आहे. यामध्ये दहा वर्षे ते सोळा वर्षे वयोगटातील मुलांमुलींचा शारीरिक व बौद्धिक विकास होत असल्याने या वयामध्ये योग्य व्यायाम आणि चांगले विचारांची गरज निर्माण झाली आहे. मुलांची शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी रोज पाऊनतास शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. तसेच चाळीशी ओलांडलेल्या महिला पुरुषांसाठी अनेक आजार होऊ लागले आहेत त्यामध्ये मधूमेह उच्च रक्तदाब हाडांची झीज होऊन अशक्तपणा येत असल्याने या व्याधींवर मात करण्यासाठी शरीर मजबूत ठेवून आनंदी मन असणे गरजेचे आहे. यासाठी करमाळा येथील किसन कांबळे सर, विनोदकुमार गांधी, भाऊसाहेब फुलारी, संजयकुमार राजेघोरपडे सर, संध्याताई ढोके, निलेश कुलकर्णि, राजेंद्र जगताप, नाना रामनवमीवाले, चंद्रशेखर रामनवमीवाले यांनी सहकार्य करत आहेत. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष