प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाला इराणच्या शास्त्रज्ञांची भेट

By : Polticalface Team ,Thu May 26 2022 17:06:53 GMT+0530 (India Standard Time)

प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाला इराणच्या शास्त्रज्ञांची भेट करमाळा प्रतिनिधी दि. २३ करमाळा येथील प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय येथे सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील थोर शास्त्रज्ञ डॉ. लिदरबर्ग यांच्या जयंतीनिमित्त सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सोसायटी ऑफ इंडिया च्या विद्यार्थी शाखेच्या व फरमेंटेड फूड फेस्टिवलच्या शुभारंभानिमित्त इराण येथील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.एल्हाम जफेर्जादेह यांनी भेट दिली. तसेच त्यांच्यासोबत सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ सोसायटी, इंडिया चे अध्यक्ष प्रा. डॉ. ए. म. देशमुख, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी चे माजी प्राचार्य प्रा.डॉ. प्रकाश थोरात, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री एम. एस. वाघमारे हे उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना डॉ. थोरात यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर संशोधन करून आपल्या गावाचे, राज्याचे व देश्याचे नाव मोठे केले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच या प्रसंगी बोलताना प्रा.गणेश करे- पाटील यांनी विविध उदाहरणातून विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन दिले तसेच कोणत्याही देशाची प्रगती व उंची पहायची असेल तर त्या देशामध्ये प्रती चौरस किलोमीटर वरती किती शास्त्रज्ञ व शिक्षक राहतात याची मोजणी करावी लागेल असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण प्रसंगी बोलताना डॉ. ए. म. देशमुख म्हणाले की, विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांमध्ये खूप संधी आहेत फक्त चांगले मार्गदर्शन मिळावयास हवे व हे मार्गदर्शन या सोसायटी मार्फत केले जाणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांनी मनामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता धाडसाने सामोरे गेले पाहिजे असे मत डॉ. देशमुख यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ प्रवीण देशमुख व इराण येथील शास्त्रज्ञ डॉ. एलहाम जफेर्जादेह यांनी दोन वर्षांच्या संशोधनातून बनवलेल्या अँटीसेप्टिक चे अनावरण सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व ते कसे बनवले गेले याचे व्याख्यानरुपी प्रसारण डॉ. एल्हाम जफरझादेह यांनी केले. तसेच या प्रसंगी यशकल्याणी सेवाभावी संस्थेकडून डॉ. एल्हाम यांना मानपत्र, सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या निमित्ताचे औचित्य साधून सूक्ष्मजीवशास्त्र या विभागाच्या मार्फत फरमेंटेड फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला याबद्दल डॉ. एल्हाम जफेर्जादेह यांनी विद्यार्थ्यांचे खूप कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, तसेच याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या उपक्रमांची चलचित्र च्या माध्यमातून माहिती घेतली व विद्यार्थ्यांना करत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल डॉ. प्रवीण देशमुख व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या प्रमुख माननीय पद्मजादेवी मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे कौतुक व अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी कु. शिफा सय्यद आणि कू. सविता आंधळकर यांनी केले तर प्रास्ताविक सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रवीण देशमुख यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या भेटीबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे संस्थापक, प्रभारी प्राचार्य व सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.