अकलूज व सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भात दिlनांक, ३० मे रोजी प्रादेशिक परिवहन पुणे येथे जनशक्ती वाजविणार हलग्या

By : Polticalface Team ,Thu May 26 2022 17:08:20 GMT+0530 (India Standard Time)

अकलूज व सोलापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भात दिlनांक, ३० मे रोजी प्रादेशिक परिवहन पुणे येथे जनशक्ती वाजविणार हलग्या करमाळा प्रतिनिधी अकलुज आणि सोलापूर येथील परिवहन यांच्या भ्रष्टाचारासंदर्भात जनशक्ती ने गेल्या पाच महिन्यात ४ निवेदने देऊन आरटीओ कार्यालयातील भ्रष्टाचार थांबवण्याची विनंती केली होती. भ्रष्टाचार न थांबल्यास आंदोलन करणार असल्याबाबत पत्र दिले. मात्र या पत्राला सोलापूर, पुणे आरटीओ कार्यालयाने केराची टोपली दाखवली. या दोन्ही कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस वाहन चालक व मालकांना आर्थिक लुटीचा भुर्दंड होऊ लागला. त्यामुळे जनशक्ती संघटना कधी आंदोलन करणार असा प्रश्न वाहन-चालक मालक यांच्याकडून विचारला जात होता..? त्यामुळे येत्या ३० मे रोजी पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर सोलापूर जिल्ह्यातील वाहन चालक मालक यांना घेऊन हलगी नाद आंदोलन करण्याचं फिक्स झाला असल्याचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यासंदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांना निवेदन दिले आहे. या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकलुज येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, मोटार वाहन निरिक्षक संभाजी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलुज आरटीओ विभागात वसुली केली जाते. त्यांच्या जोडीला अश्विनकुमार पोंदवुले, संदीप पाटील, वैभव राऊत हे चार मोटार वाहन निरिक्षक आणि खाजगी ३० व्यक्ती यांच्यामार्फत कार्यक्षेत्रात येणाऱ्या जड वाहतुक करणाऱ्या २७०० वाहनधारकांकडून प्रती महिना २,५०० प्रमाणे ६७,५०,००० तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरवरून मंगळवेढा-मरवडे रोडवर २४ तास चेकपोस्टच्या नावाखाली ६ चाकी वाहनांकडून प्रती वाहन ३०० रुपये , १० चाकी वाहनांकडून ४०० रुपये, १२ चाकी वाहनांकडून ५०० रुपये, १६ चाकी वाहनांकडून ७०० रुपये तिथुन पुढील वाहनांकडून १००० रूपये प्रती वाहन घेतले जातात. त्यांना कोणतीही पावती दिली जात नाही. एका दिवसात १००० वाहने ये-जा करतात, त्यांचे किमान ५ लाख रूपये प्रती दिवसाला म्हणजे महिन्याला दिड कोटी रुपये जमा होतात. पुण्यावरून लातूर-मराठवाडा आणि सोलापूरकडे जाणाऱ्या खाजगी बसेस (लक्झरी) यांना महिन्यातून एकदा बार्शी बायपासला आणि सोलापूर मोहोळ रोडवर सावळेश्वर जवळ या बसेस रात्र पाळीने अडविल्या जातात. यापैकी १५० बस मराठवाडयात जाणाऱ्या असतात. त्यांची वसुली करण्यासाठी बार्शी बायपासला २ आरटीओ सरकारी गाडया आणि ४ अधिकारी एका खाजगी जीप मध्ये एक खाजगी व्यक्ती त्यात बसवून व ४ मुले ५०० रू. पगार देऊन पर रात्रीला ठेवली जातात. मुलांकडून बस ड्रायव्हरला सांगितले जाते परमिट घेऊन जावा, खाजगी गाडीतील माणुस परमिट बघुन १५०० रू. घेतो, पावती देत नाही. एकूण १५० गाड्यांचे प्रती गाड़ी १५०० प्रमाणे एकूण २,२५,००० रूपये याच पध्दतीने सावळेश्वर येथील एकूण ११५ गाड्यांचे १,७२,५०० रूपये दोन्ही मिळून ३,९७,५०० रू. एका रात्रीत: गोळा केले जातात. अकलुज कार्यक्षेत्रात ६ ठिकाणी कॅम्प घेतले जातात, त्यात माढा, कुर्डुवाडी, टेभुर्णी, सांगोला, करमाळा, मोडनिंब या ठिकाणी प्रत्येक गावाला ९० लायसेन्स असे एकूण ५४० लायसेन्स प्रत्येकी ५०० रु. प्रमाणे एकूण २,७०,००० जमा केले जातात. प्रत्येक गावाला २५ जुन्या एकूण १५० गाडया पासिंग केल्या म्हणजे प्रत्येकी ३,००० प्रमाणे ४,५०,०००/- रूपये जमा केल्या जातात. एकूण ७,२०,००० असे अनेक गोष्टी साठी एजंटकडून पैसे गोळा केले जातात. उदा. एच.पी. कमी करणे, लायसेन्स रिनिव्ह करणे, गाडी पासिंग करणे, ट्रॅक्टर पासिंग करणे हा हिशोब तर वेगळाच आहे. कमीत कमी हा आकडा २ कोटी २८ लाख ६७ हजार पाचशे रूपयांपेक्षाही जास्त जातो.. या चौघांचा बॉस म्हणून काम करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या सल्ल्याने या सर्व पैशांचे वाटप सर्वात होते. तसेच अर्चना गायकवाड यांच्याकडे सोलापुरचाही चार्ज असल्यामूळे सोलापूर येथे २१ मोटार वाहन निरिक्षक असून त्यांचा आकडा कोट्यावधी रुपये मध्ये जातो. अर्चना गायकवाड यांचे मुळ गाव हे सोलापूरच असल्यामूळे आणि त्यांचे राजकारणातील लोकांशी संबंध असल्यामूळे सर्वसामान्य वाहन चालक मालक त्यांच्या दबावापोटी भयभीत जीवन जगत आहेत. तरी संभाजी गावडे, संदीप पाटील, अविनाशकुमार पोंदवले व वैभव राऊत व अर्चना गायकवाड यांची खातेनिहाय निपक्षपातीपणे चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि सोलापूर जिल्हयातून त्यांची त्वरीत बदली करून सोलापूर जिल्हयाला आरटीओच्या जाचातून मुक्त करावे अन्यथा दि. ३० मे २०२२ रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांचे कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित अतुल खुपसे पाटील बाबाराजे कोळेकर अंकित वाकुडे करण अंबुरे उपस्थित होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष